देशात सध्या तुरीचे भाव (Tur Rate) तेजीत आहेत. यंदा देशातील उत्पादन घटलं. तर आयातही (Tur Import) सरकारच्या उद्दीष्टापेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दरवाढीची (Tur Rate) अपेक्षा आहे. परिणामी सध्या तुरीची विक्री कमी करताना दिसत आहेत.
त्यामुळं बाजारातील तूर आवकेचा (Tur Arrival) दबाव कमी झाल्यानंतर दर ८ हजार ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या तुरीची आवक कमी आहे. तुरीची अनेक भागांमधील काढणी आता पूर्ण होत आहे. तर बहुतांशी भागातील काढणीची कामं वेगानं सुरु आहेत. तुरीला सध्या चांगाल भाव मिळतोय. त्यातच यंदा उत्पादन घटल्यानं दर वाढू शकतात, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
त्यामुळं शेतकरी तुरीची कमी प्रमाणात विक्री करत आहेत. परिणामी सध्या बाजारातील आवक कमी आहे. पण दुसरीकडं उद्योगांकडून तुरीची खरेदी सुरु आहे. तुरीला उठाव असल्यानं दरात वाढ पाहयला मिळाली.

