समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादवउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव त्याच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी दिली आहे. त्यांच्यावर ग्रुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. ” माझे आदरणीय पिता आणि सर्वांचे नेते या जगात राहिले नाहीत,” असे अखिलेश यादव यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे.
मुलायमसिंह यादव यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलायमसिंह यांना यूरिन इन्फेक्शन झाले आहे. त्यांना एक महिन्याआधीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या शरिरातील ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यांचा रक्तदाबही वाढला होता. डॉक्टर त्यांच्या हालचालीकडे लक्ष ठेवून होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मेदांताच्या आयसीयूत हलवण्यात आले होते.