श्री रामेश्वर कृषी मार्केट (खारीफाटा) उमराणे (ता. देवळा) खारीफाटाचे लोकेशन असे आहे, की एकाचवेळी सर्व बाजारपेठांशी चांगला कनेक्ट आहे. मुंबई आग्रा महामार्ग, मनमाड जंक्शनच्या जवळ आहे. सुरत, इंदूरला पोचणाऱ्या रस्त्यांच्या केंद्रानजिक खारीफाटा वसले आहे. खंडुकाका देवरेंनी खारीफाट्यावर भारतातले सर्वांत मोठे खासगी कांदा मार्केट उभे केले आहे. दिवाळी पाडव्यापासून २०२१मध्ये प्रारंभ झालाय. कांद्याबरोबर मका खरेदीचे कामकाज देखिल सुरू आहे.
श्री रामेश्वर कृषी मार्केटमध्ये ‘इंटेलो लॅब’ या टेक्नो कंपनीच्या माध्यमातून ई ट्रेड सिस्टिम विकासाचे काम सुरू आहे. बी टू बी प्लॅटफॉर्म असेल. याद्वारे दिवसाकाठी दोन अडीच हजार टन कांदा मालाचे हॅंडलिंग सहज शक्य होईल.
खंडुकाका व्यापारी- उद्योजक आहेत. श्री रामेश्वर कृषी मार्केट ही त्यांची अलिकडच्या काळातील नवनिर्मिती आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून ते व्यापारात आहेत. दिवसाला 14 तास काम मिळाले तर बरे वाटते, असे ते सांगतात.

खंडुकाकांनी व्यावसायिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. कसमादे – चार तालुक्यातील शेतकऱ्यांचा अढळ विश्वास ही त्यांची खरी संपत्ती आहे. भारतातले सर्वांत मोठे कांदा व्यापारी म्हणून त्यांची ओळख. त्याहीपेक्षा वेगवान कामकाज, विश्वासार्हता आणि व्यवसायातील अॅग्रेशनमुळे त्यांचे नाव अधिक चर्चेत असते.
रामेश्वर कृषी मार्केटमुळे कांद्याच्या सोर्सिंगची सर्वांत मोठी इकोस्टिस्टम खारीफाटा परिसरात उभी राहत आहे. त्यातून शेतकरी कुटुंबातूनच अनेक व्यापारी, व्यावसायिक उभे राहत आहेत. भविष्यात खारीफाटा हे सर्वांत वेगाने वाढणारे कमोडिटी सोर्सिंग, हॅंडलिंग व एक्स्पोर्टिंग सेंटर म्हणून उद्याला येईल.
परवा एक शेतकरी मित्र म्हणाले, की “रामेश्वर मार्केट सुरू झाल्यापासून अन्य मार्केटमध्ये शेतकऱ्यांना थोडा रिस्पेक्ट मिळायला लागला आहे! स्पर्धा सुरू झाल्याने आता अन्य मार्केटमध्येही सुविधा वाढतील…अॅरोगन्स कमी होईल.”
श्री रामेश्वर मार्केटपुढे आजही समस्या आणि आव्हाने आहेत. त्यातून हे मार्केट आणखी मोठे होईल. सर्वांना खंडुकाकांकडून शिकण्यासारखे खूप काही आहे. काकांचे नेटवर्क, कामातला वेग आणि धडाडी, नवी टेक्नॉलॉजी व ट्रेंड पकडण्याचे कसब आणि जोडीला अस्सल पारंपरिक शहाणपण.
एक निरीक्षण असे की, ज्या दिवशी रामेश्वर मार्केट पाहिले, त्या दिवशी इंटेलो लॅब या कमोडिटी स्टार्टअपच्या युवा एंटरप्रेन्युअर्सची भेट झाली. ते खंडुकाकांकडून काही गोष्टी शिकत होते, तर काका त्यांच्याकडून नव्या गोष्टी समजून घेत होते…टेक्नोलॉजी आणि ग्राऊंड स्किल्सचा मिलाप होताना दिसला. असे दिसतेय की, भारतातील बहुतांश अॅग्रीटेक, फिनटेक भविष्यात रामेश्वर मार्केटशी जोडले जातील.
श्री रामेश्वर मार्केटमध्ये सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू होते. एक किलोमीटरचा परिसर, वाहणारे रस्ते स्तब्ध होतात…काका सांगतात, सर्व लोकांना एका सुत्रात जोडल्याचा आनंद आहे…श्री रामेश्वर मार्केट नक्की पुढे जाईल…कसमादे (कळवण सटाणा मालेगाव देवळा) भागात नव्याने उद्योजकीय चळवळीची पायाभरणी रामेश्वर मार्केटमुळे सुरू झालेली आहे.
–
क्रेडिट : Deepak Chavan. Khandukaka Deore Khandukaka Deore – खंडुकाका देवरे