आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. ख्रिसमच्या सुट्ट्यांनंतर मंगळवारी म्हणजेच २७ डिसेंबरला शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. पहिल्याच दिवशी सोयाबीन दराने मोठी झेप घेतली होती. सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. काल सोयाबीनला १५.१८ डाॅलर प्रतिबुशेल्स सर्वाधिक दर मिळाला. क्विंटलमध्ये हा दर ४ हजार ६५० रुपये होतो. मात्र दराची उच्च पातळी गाठल्यानंतर वायदे १४.९० डाॅलरवर म्हणजेच क्विंटलमध्ये ४ हजार ५७० रुपयांवर बंद झाले.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोयाबीनने मागील सहा महिन्यातील उच्चांकी दर गाठला होता. तर देशातील काही बाजारांमध्येही सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर सध्या तेजीत आहेत. ख्रिसमच्या सुट्ट्यांनंतर मंगळवारी म्हणजेच २७ डिसेंबरला शिकागो बोर्ड ऑफ ट्रेडवर सोयाबीनचे व्यवहार सुरु झाले. पहिल्याच दिवशी सोयाबीन दराने मोठी झेप घेतली होती. सोयाबीन दरानं मागील सहा महिन्यांतील उच्चांकी दर गाठला होता. काल सोयाबीनला १५.१८ डाॅलर प्रतिबुशेल्स सर्वाधिक दर मिळाला. क्विंटलमध्ये हा दर ४ हजार ६५० रुपये होतो. मात्र दराची उच्च पातळी गाठल्यानंतर वायदे १४.९० डाॅलरवर म्हणजेच क्विंटलमध्ये ४ हजार ५७० रुपयांवर बंद झाले.
पण आज म्हणजेच २८ डिसेंबरला बाजार सुरु झाल्यानंतर दर पुन्हा वाढले. आज सोयाबीनच्या दरात जवळपास एक टक्क्यांची वाढ झाली होती. आज वायदे १५ डाॅलरवर होते. क्विंटलमध्ये हा दर ५ हजार ६०० रुपये होतो.
खाद्यतेलाचेही दर वाढले
काल सीबाॅटवर व्यवहार सुरु झाले तेव्हा खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती. सोयाबीन तेलाचे वायदे ४ टक्क्यांनी वाढले होते. आजही सोयाबीन तेलाच्या दरात चढ उतार राहीले. तसेच कच्च्या पामतेलाचे दरही वाढले. बुर्सा मलेशिया एक्सचेंजवर कच्च्या पामतेलाचे भाव ४ हजार रिंगीट प्रतिटनांच्या पुढे गेले. त्यामुळं सोयातेलाला आधार मिळला. तसंच सोयाबीनला मागणीही चांगली राहीली. त्यामुळं सोयाबीनच्या दरात सुधारणा पाहायला मिळाली.
देशातील दरपातळी
आज देशातील बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे वाढले होते. आज सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. देशातील बाजारात आज ४ लाख ३० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.
विविध राज्यांतील आवक
आज मध्य प्रदेशातील बाजारात सव्वा दोन लाख क्विंटल, महाराष्ट्रात सव्वा लाख क्विंटल आणि राजस्थानमध्ये ४० हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. दरचा विचार करता सर्वच राज्यांमध्ये दरपातळी जवळपास सारखीच होती.
दर वाढतील का?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढत आहेत. तसेच कच्चे पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचेही दर वाढले आहेत. जानेवारी महिन्यात सोयाबीनचे दर सुधारु शकतात. काही जाणकारांनी जानेवारी महिन्यात सोयाबीन दर ६ हजार रुपांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला.