पारनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून, तोडणी वाचून ऊस शेतात उभा आहे. यामुळे उसाला तुरे आले आहेत. पर कारखान्यांची मनमानी, उसतोड टोळ्या वाढविण्यात कुचराई, नोंदणी असूनही तोड करण्यात दिरंगाई, तोंड पाहून उसतोड सुरू आहे. यंदा पारनेरच्या क्रांती शुगर कारखान्याचे धुराडे न पेटल्याने पारनेर तालुयातील शेतकर्यांचा ऊस गाळपविना शेतात उभा असून, उसाला तुरे आले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकर्यांना बसणार आहे.
एरवी ऊस आपल्या कारखान्याला मिळावा यासाठी शेतकर्यांचे उंबरे झिजवणारे कारखाने आता त्यांच्याच कार्यक्षेत्रात ऊस जास्त असल्याने व त्यांच्या शेतकर्यांची काळजी असल्याने पारनेरच्या शेतकर्यांच्या नुकसानीचे त्यांना काहीच देणे घेणे नसल्याचे दिसून येते. उसतोड लांबणीवर टाकत, त्यांच्या सोयीनुसार तोड केली जाते. शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून कारखाना कार्यालयात उंबरठे झिजवत आहेत. परंतु, आज-उद्या असे करत दोन महिने लोटले आहेत. कारखान्यांनी शेतकर्यांना झुलवत ठेवले आहे. नावापूरात जवळच्या शेतकर्याचा ऊस तोड करायचा, नोव्हेंबर महिन्यातील ऊसतोड नोंदी असताना जानेवारी उजाडला तरी ऊस तोड येत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला. एरवी 10 ते 15 उसतोड टोळ्या पारनेरमध्ये उपलब्ध असायच्या, आता दोन ते चार टोळ्यावर काम चालवले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचा ऊस तोडणीवाचून उभा आहे.
परिणामी दिवस भरून गेल्याने उसाला तुरे येऊ लागले आहेत. शेजारचे कारखाने जेव्हा ऊस कमी पडेल तेव्हा पारनेरवर लक्ष केंद्रित करणार, साहेबांच्या पुढे पुढे करणार्यांचे; मात्र नोंदणी नसतानाही ऊस तोडले जात आहेत. परंतु सर्वसाान्य शेतकर्यांचे काय? त्यामुळे कारखान्याच्या कार्य पद्धतीवर शेतकर्यांनी नाराजी व्यक्त केली.

