Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » उन्हाळी बागायती कपाशी नियोजन
ताज्या बातम्या

उन्हाळी बागायती कपाशी नियोजन

Neha SharmaBy Neha SharmaApril 12, 2022No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

कपाशीचे पीक हे जास्त कालावधीचे पीक आहे. कपाशीसाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. कपाशीच्या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस, अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. कपाशीसाठी किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असावी लागते. उष्ण दिवस आणि थंड रात्र याप्रकारचे हवामान बोंडे चांगली भरण्यास व उमलण्यास उपयुक्त असते.

कपाशीचे पीक सुमारे सहा महिने शेतात राहत असल्यामुळे योग्य जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची असते. कपाशी लागवडीसाठी काळी, मध्यम ते खोल (९० सें.मी) व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन निवडावी. उथळ, हलक्या क्षारयुक्त आणि पानथळ जमिनीत कपाशीची लागवड करण्याचे टाळावे. अन्नद्रव्याची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामू साधारणत: ६ ते ८.५ पर्यत असावा.

कपाशीच्या झाडांची मुळे जमिनीत ७० ते ९० दिवसात ६० ते ९० सें.मी पर्यंत खोल वाढतात. कपाशीच्या मुळांची वाढ चांगली व्हावी यासाठी, एक खोल नांगरट व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकांची धसकटे, पळकाट्या, पाला व इतर कचरा गोळा करुन तो जाळावा व शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोग यांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. शेणखत वा कंपोस्ट खत हेक्टरी २५ गाड्या या प्रमाणात मिसळावे. ९० सें.मी. अंतरावर उथळ स-या पाडाव्यात, उथळ स-यांमुळे कपाशीला आवश्यक तेवढे पाणी देता येते व त्यामुळे पाण्याची बचत होते. खोल व रुंद स-यांमुळे झाडाची मुळे वर राहतात व जादा पाण्यामुळे पिकांची कायिक, शाकीय वाढ जास्त होऊन उत्पादनात घट येते. शिवाय पाणीही जरुरीपेक्षा जास्त दिले जाते. स-यांची लांबी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ मीटर ठेवावी

पेरणीतील अंतर

उन्हाळी बागायती कपाशीमध्ये पेरणीचे अंतर ही बाब अतिशय महत्त्वाची ठरते. कपाशीच्या दोन ओळींतील व दोन झाडांतील अंतरावर कपाशीच्या दर हेक्टरी झाडांची संख्या अवलंबून असून त्यासाठी पुढील प्रमाणे अंतर ठेवावे. वाणाचा प्रकार

वाणाचा प्रकार

पेरणीचे अंतर (सें.मी)

हेक्टरी झाडांची संख्या

एकरी झाडांची संख्या

  1. सुधारित

९० X ६०

  • ,५१८
  • ,४०७
  1. संकरित
अमेरिकन X अमेरिकन

९० X ९०

  • ,३४५
  • ,९३८
अमेरिकन X इजिप्शियन

९० X १२०

  • ,२५९
  • ,७०३

 

पेरणीसाठी वाणांची निवड

बागायती कपाशीसाठी सुधारित/संकरित वाणांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी तसेच बियाणे प्रमाणीत असल्याची खात्री करुनच विकत घ्यावे. उन्हाळी हंगामात दख्खन कालवे विभागात लागवडीसाठी पुढील वाणांचाच वापर करावा.

वाण

कालावधी (दिवस)

उत्पादन (क्वि./हे.)

रुईचा उतारा (टक्के)

धाग्याची लांबी (मि.मी)

हेक्टरी बियाणे (किलो)

शिफारस केलेले जिल्हे

सुधारित वाण अ) अमेरिकन
१.एलआरए ५१६६ १६०-१७० २०-२२ ३५-३६ २६-२७ ७-८ कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
२.जेएलएच – १६८ १५०-१६० १५-२० ३५-३६ २६-२७ ७-८ महाराष्ट्रातील खानदेश विभाग
३.फुले ६८८ १५०-१६० २२-२५ ३७ २६-२७ ७-८ महाराष्ट्रातील दख्खन कालवे विभाग
संकरित वाण अ) अमेरिकन X अमेरिकन
१.एच -१० १६०-१७० २५-२८ ३६-३७ २६-२७ २.५-३ कापूस पिकविणारे सर्व जिल्हे
ब) अमेरिकन X इजिप्शियन
१.डीसीएच-३२ १८०-१९० १२-१५ ३२-३३ ३४-३५ २.५-३ सांगली, सातारा, सोलापूर
२.फुले -३८८ १७०-१७५ १५-२० ३३-३४ ३४-३५ २.५-३ सांगली, सातारा, सोलापूर

 

महाराष्ट्रातील शिफारशीत निवडक बीटी संकरित कापूस वाण

  1. अमेरिकन X अमेरिकन
कंपनीचे नाव/संस्थेचे नाव बी.टी.संकरित वाण
राशी सीड्स, अतूर, तामिळनाडू राशी-२, शक्ती-९, साई, राशी- ६५६
अंकूर सीडस् नागपूर अंकुर ०९, अंकुर ६५१, जय
महिको सीडस्, जालना एमआरसी – ७३२६, एमआरसी – ७३५१
अजित सीडस्, औरंगाबाद अजित -११, अजित-१५५, अजित-१७७, अजित १९९
कृषिधन सीडस्, जालना केडीसीएच-४४१ त्रिनेत्र
नाथ सीडस्, औरंगाबाद एनसीईएच -२ आर
तुलसी सीडस्, गुंटुर तुलसी – ४
विक्रम सीडस्, अहमदाबाद व्ही आयसीएच-५, व्ही आयसीएच-१५
जे.के.सीड्स, हैद्राबाद वरुण, दुर्गा
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबाद बन्नी, मल्लिका, कनक -९५४, भक्ति
पारस सिड्स ब्रह्मा

देशामध्ये सन २०१२-१३ पर्यंत १००० पेक्षा अधिक बीटी वाण आहेत. शेतक-यांनी आपल्या गरजेनुसार वाणाची निवड करावी.

ब) अमेरिकन X इजिप्शियन

कंपनीचे नाव बी.टी.संकरित वाण
नाथ सीडस्, औरंगाबाद काशिनाथ
कृषिधन सीडस्, जालना सुपर फायबर
महिको सीडस्, जालना एमआरसी – ७९८१
अंकूर सीडस् नागपूर अंकूर – १९५१
न्युज्युविड् सीड्स लि., हैद्राबाद एन.सी.एच.बी.९९२

 

    बीजप्रक्रिया
  • बुरशीनाशक

अप्रमाणित बियाण्यास थायरम बुरशीनाशकांची प्रक्रिया प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणात करावी. त्यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

  • जीवाणू संवर्धक

हवेतील नत्राचे स्थिरीकरण करुन नत्र खतांच्या मात्रेत बचत करण्यासाठी अॅझोटोबॅक्टर किंवा अॅझोस्पिरीलम या जीवाणू संवधर्काची प्रति किलो बियाण्यास २५ ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी. तसेच जमिनीतील मातीच्या कणांद्वारे धरुन ठेवलेले स्फुरद पिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी स्फूरद विरघळणा-या जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी म्हणजे नत्र व स्फुरदयुक्त खताच्या मात्रेमध्ये जवळजवळ २५ ते ३० टक्के बचत होते.

पेरणी

बागायती बिगर बीटी कपाशीची पेरणी वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. पेरणी उशिरा झाल्यास वेचणीच्या वेळी पाऊस येऊन नुकसान संभवते किंवा त्यावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनाता घट येते. पेरणी झाल्यानंतर लगेचच ४ ते ६ इंच आकाराच्या सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांमध्ये माती आणि कंपोस्ट अथवा शेणखत भरावे व भरपूर पाणी द्यावे. नंतर प्रत्येक पिशवीवर २ ते ३ बिया लाव्याव्यात. या पिशव्यांचा उपयोग नांगे भरण्यासाठी करावा. तोपर्यंत पिशव्या झाडाच्या सावलीत ठेऊन त्यांचे किडीपासून सरंक्षण करावे व वरचेवर पाणी द्यावे. साधारणपणे एका एकराच्या नांग्या भरण्यासाठी २५० ते ३०० पिशव्या पुरतात.

वेगवेगळ्या भागासाठी, उदा. १) सोलापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांसाठी मार्चचा पहिला पंधरवडा, २) अहमदनगर जिल्हयासाठी एप्रिलचा पहिला पंधरवडा आणि ३) खानदेश, विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मे चा दुसरा पंधरवडा, याप्रमाणे पेरणीच्या वेळीची शिफारस केलेली आहे. पेरणी करताना सरीच्या मध्यावर २-३ इंच खोल खड्डा करावा व त्यात शिफारस केल्याप्रमाणे रासायनिक खते, बिया टाकून पूर्णपणे मातीने झाकावे व लगेच पाणी द्यावे. तसेच सरी पाडण्यापूर्वी शेणखत दिले नसल्यास प्रत्येक खड्ड्यात रासायनिक खतांबरोबर शेणखत द्यावे.

बीटी कपाशी वाणांची लागवड वातावरणाचे तापमान ३५ डि.से.पेक्षा कमी झाल्यावरच (२५ मे नंतर) करावी. तसेच कपाशीची लागवड जमीन ओलावून वापशावर करावी.

माहिती स्रोत : कृषी विभाग महाराष्ट्र शासन

cotton Summer horticultural cotton planning
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Agriculture Market : चुनाव की आपाधापी में किसान संकट में; सोयाबीन और चना सहित कृषि उपज की कीमतों में गिरावट।

March 28, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.