उन्हाळी हंगामात काळजी घेण्यासारखे तिसरे महत्वाचे फळ पीक आंबा असून पहिल्या वर्षी लावलेल्या कलमांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावली करावी. जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी वाळलेल्या पालापाचोळ्याने तसेच गवताच्या किंवा उसाचा पाचटाणे झाडाच्या बुध्याभोवती आच्छादन करावे, आंब्याच्या बागांना पाणी देण्याची प्रथा नसली तरी पहिल्या वर्षी उन्हाळ्यात २ ते ३ दिवसांच्या अंतराने, २ ते ५ वर्ष वयाच्या झाडांना ४ ते ५ दिवसांच्या अंतराने तर ५ ते ८ वर्ष वयाच्या झाडांना १o ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
त्याचप्रमाणे तुडतुड्यापासून मोहोरावर होणारा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी कार्बारिल ४ ग्रॅम प्रती लिटर पाण्यातून मोहोरावर फवारावे किंवा ३00 मेश गंधक भुकटी + १0 टक्के कार्बारिल भुकटी समप्रमाणात वारा शांत असताना धुरळावी. त्यामुळे मोहोरावरील तुडतुड्यांचे तसेच भुरी रोगाचेही नियंत्रण होईल .
झाडावरील फळांची गळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. १o पी.पी.एम. किंवा दोन ते चार डी.१५ पी.पी.एम. किंवा अलार १00 पीपीएम या वाटाण्याच्या आकाराची असताना तर दुसरी फवारणी फळे बोरा एवढी झाल्यावर करावी.

