मुंबई, ४ मार्च – भारतातील उन्हाळी तेलबियांची पेरणी ४ मार्च रोजी २०.६४ टक्क्यांनी घसरून २.६९ लाख हेक्टर झाली असून गेल्या वर्षी याच दरम्यान ३.३९ लाख हेक्टरवर तेलबियांची पेरणी झाली होती.
या मध्ये शेंगदाणा (भुईमूग ) च्या खालील क्षेत्र १.८० (लाख हेक्टर ) वर झाली असून गेल्या वर्षी २.४२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. सूर्यफूलाच्या क्षेत्रात सुद्धा घट झाली असून गेल्या वर्षी च्या तुलनेत ०.१८ लाख हेक्टर आहे. करडई खालील क्षेत्र ०.६० लाख हेक्टर झाले असून गेल्या वर्षी ०.६४ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती
चालू वर्षी देशातील उन्हाचा प्रकोप वाढला असून पाण्याअभावी शेतकरी वर्ग लागवडी करताना सावध असल्याने लागवडी मध्ये घट झाली झाली आहे
| Commodity | Area sown In Lakh Hectare 2022 | Area sown In Lakh Hectare 2021 |
| Groundnut | 1.80 | 2.42 |
| Sunflower | 0.18 | 0.30 |
| Sesamum | 0.60 | 0.64 |
| Other Oilseeds | 0.10 | 0.02 |
| Oilseeds | 2.69 | 3.39 |
साभार : कमोडिटीकंट्रोल
