2022 नमस्कार जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण स्वीट कॉर्न म्हणजे शुगर मका या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत.
2018/19 पासून लष्करी अळी चा प्रादुर्भाव वाढल्याने या पिकाकडे पहाण्याचा दृष्टीकोन थोडासा बदललला आहे. सर्व साधारण पणे कमी खर्चात हुकमी उत्पन्न देणारे स्वीट कॉर्न हे पिकं थोडं दुर्लक्षित झाले. मागिल 15/20 वर्षाचा अभ्यास करता स्वीट कॉर्न मका चे बाजार भाव हे 1 जुन ते 15 ऑगस्ट आणि 10 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत वर्षेभरातील सर्वात टॉप चे भाव हे या कालावधीत पहायला मिळतात.2016चे च उदाहरण घेतले तर 11 नोव्हेंबर ला नोटा बंदीचा निर्णय झाला आणि सर्व भाजीपाला मंदीच्या तडाख्यात सापडलेला पहायला मिळाला .
सर्व तरकारीचे भाव कोसळलेले असताना स्वीट कॉर्न चे भाव 15 डिसेंबर2016 ते 15 सप्टेंबर 2017 ला 10 ते 15 रुपये इतक्या सन्मान जनक पातळीवर टिकून असलेले दिसले.जे उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायतशीर ठरते. स्वीट कॉर्न हे असे पिक आहे की आपला उत्पादन खर्च हा जी कणसे काढून जातात आणि राहिलेला हिरवा चारा उरतो त्या मध्ये 70% च्या आसपास निघून येते आणि कणसांचे उत्पन्न हे निव्वळ नफा ठरते.
एकरी उत्पादन खर्चाचा विचार करता स्वीट कॉर्न च्या कणसांचे जे उत्पादन मिळते ते सर्व साधारणपणे एक किलो बियाण्यापासून 3/4 टनांपर्यंत मिळते . आणि एकरी 2 ते 2.5 किलो बियाणे लागते आणि त्या पासून 6/7 टनांपर्यंत कणसांचे उत्पादन मिळाले आणि 12 ते 15 रुपये जरी किलोचा भाव गृहीत तरी 80 हजार ते 1 लाख रुपये केवळ कणसांपासून उत्पन्न मिळते त्या बरोबरच 3/4 टन हिरवा चारा पण मिळतो जो 2/3 हजार रुपये टनाचा भाव दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून मिळतो.
15 मार्च ला आपला एक फेसबुकवर मेसेज होता की जुन ते ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वीट कॉर्न मक्याचे भाव 16/20 रुपये किलो रहाण्याची शक्यता आहे.जे प्रत्यक्षात सातत्याने दिसून आले.सप्टेबर ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत पण स्वीट कॉर्न चे भाव 15+ टिकून रहाण्याची शक्यता आहे आणि 15 डिसेंबर ते 15 जानेवारी 2023 या महिनाभराच्या कालावधीत पुन्हा वर्षभरातील उच्चतम पातळी 18/22 रुपये किलो या दरम्यान पहायला मिळू शकतात .
15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत स्वीट कॉर्न मका पिक हार्वेस्टिंगला आणावयाचे असेल तर आपणाला लागवड ही सर्व साधारणपणे 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत पूर्ण करावी लागते .कारण डिसेंबर महिन्यात थंडी चे प्रमाण जसे वाढते तसा हार्वेस्टिंग चा कालावधी वाढतो.उन्हाळ्यात 80/85 दिवसांत तयार होणारे हे पिकं थंडी मध्ये 110 ते 120 दिवसांपर्यंत काढणीस वेळ घेते.त्यामुळे या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करणे अत्यावश्यक आहे .
बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏🙏🙏🙏 शिवाजी आवटे 5/9/2022