गेवराई पैधा गावचे सरपंच मंगेश साबळे यांनी गळ्यात दोन लाख रुपयांच्या नोटांची माळ घालून पंचायत समिती बीडीओचा निषेध केला. याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विहीर मंजूर करण्यासाठी बीडीओ अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना पैसे मागितल्यामुळे संतप्त सरपंचाने पंचायत समिती कार्यालयासमोर हे कृत्य केलं आहे.
याबाबत सरपंच म्हणाले, मी अपक्ष सरपंच झालो आहे. मी निवडणुकीत पैसे वाटले नाहीत, विहीर मंजूरीसाठी शेतकऱ्यांना कुठल्या तोंडांनी पैसे मागू. तुम्ही जर एखाद्या सभापतीचं, एखाद्या आमदाराचं ऐकून फक्त पैशावाल्यांच्या विहिरी करणार असाल तर मायबापाहो गरिबांचं काम कोण करणार? गरिबाला कोण वाली आहे?” असा प्रश्न साबळे यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विहिरी मंजूरीसाठी अधिकारी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत, अशी तक्रार शेतकऱ्यांनी सरपंच साबळे यांच्याकडे केली होती. याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.राज्य सरकारच्या विहीर अनुदान योजने अंतर्गत गेवराई पैधा गावाचे शेतकऱ्यांनी पंचायत समिती बीडीओकडे विहीर मंजूरीसाठी अर्ज केला होता.
असे असताना बीडीओने विहीर मंजूरीसाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप सरपंच साबळे यांनी केला. त्यामुळे सरपंचाने २ लाख रक्कमेच्या नोटांची माळ त्यांनी गळ्यात अडकून बिडिओच्या गैरकृत्याचा पाढा वाचत नोटांची उधळण केली. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.
यावेळी साबळे यांनी बिडिओने विहीर मंजूरीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केला. “दहा-दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांकडून जमा करून दोन लाख रुपये मी घेऊन आलो आहे. या पंचायत समितीच्या बिडिओला आम्ही हे पैसे देतोय, असे त्यांनी म्हटले आहे.