मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक पार पडली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.
राज्यात ६९२.७४ चौ.किमी.चे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धवठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. वन क्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनर्वसन व मोबदला याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही या बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तात्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी दिले.

