सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी सरकारकडे याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका शेतकऱ्याने 20 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मुद्रा रेखाटली आहे. तर एका कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी (Sharad joshi) यांचेही चित्र रेखाटले आहे.
यामुळे याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी पुरेसं काम करत नाहीत, त्यांचं शेतकऱ्यांकडं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना आंदोलन करुनही काही मिळत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार होणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यामुळे भाव कधी वाढणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

