हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा उगम झाला, मात्र उत्पादन वाढले असताना मातीचे आरोग्य बिघडत गेले, सेंद्रिय घटक, पीक फेरपालटाचा अभाव, खतांचा असंतुलित वापर आदी कारणांमुळे जमिनीची सुपिकता खालावली आहे, त्याचे दुष्परिणाम अन्नधान्य उत्पादनातून दिसू लागले आहेत,
डॉ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कार्यान्वित अखिल भारतीय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य संशोधन प्रकल्पांतर्गत राज्यात विभागनिहाय मातीचे परीक्षण करण्यात आले, त्यात मातीत गंधक, जस्त, लोह, बोराँनची कमतरता वाढत चालल्याची बाब प्रामुख्याने समोर आली आहे, तपासणी अहवालाचे निष्कर्ष महाराष्ट्रातील जमिनीत उपलब्ध गंधक कमी ते मध्यम प्रमाणात दिसून आले,
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जस्ताची कमतरता सर्वात जास्त असून, त्यानंतर लोहाची उपलब्धता कमी असल्याचे समोर आले, बोराँनची कमतरता मुख्यतः हलक्या व तांबड्या जमिनीत दिसून आली,
जमीन आरोग्य व सुपीकता टिकवण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन महत्वाचे असून, सेंद्रिय खते (जसे शेणखत, कंपोस्ट, काडीकचरा, गांडूळ खत इत्यादी) आणि हिरवळीची खते (जसे बोरु, धैंचा, ताग, गिरीपुष्प इत्यादी) यांचा शेतात नियमित वापर करणे गरजेचे आहे,
अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीत पिकांना संतुलित प्रमाणात व शिफारशीनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा व्हावा,
पिकांना चांगल्याप्रकारे अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन जमिनीत रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पध्दतीचा वापर नियमितपणे करावा,
दरवर्षी पिकांची फेरपालट हवी,
जमिनीच्या प्रकारानुसार (हलकी, मध्यम व भारी) पिके घ्यावीत,
जमिनीचा अल्कधर्मी सामू,सेंद्रिय कर्बाची कमतरता, एक पीक पध्दतीचा अवलंब, चुनखडीयुक्त, क्षारयुक्त आणि चोपण जमिनी, जमिनीची धूप होणे, आणि रासायनिक खतांचा असमतोल वापर यामुळे जमिनीत विविध व अनेक अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येत आहे, त्यामुळे शेतकर्यांनी शिफारशीप्रमाणे खते दिली पाहिजेत @@
हिच मागणी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने – महारुद्र शेट्टे