सध्या पाऊस पडतो आहे त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर टोमॅटो पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कॅल्शियम, स्फुरद, पालाश, झिंक, फेरस यासारखी अन्नद्रव्ये अपटेक होत नाहीत त्याचा परिणाम म्हणून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. त्याच बरोबर काही ठिकाणी टोमॅटो पिकांच्या फांदीमध्ये गाभाच तयार होत नाही. हे सर्व अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे आहेत त्यासाठी लागणार्या सर्व अन्नद्रव्याची वेळीच पुर्तता करावी व होनारे नुकसान टाळावे.
टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने
टोमॅटो पिकांतील 30 ते 40 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना त्यात 12:61:00 = 3 किलो अधिक प्राईम झाईम 1 लिटर अधिक न्युट्रीमिक्स 500 ग्रॅम किंवा 13:40:13 = 3 किलो
किंवा 05:45:05:7zn = 3 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो किंवा 13:00:45 = 4 किलो + कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन = 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे कोणतेही एक आलटुन पलटून आळवणी घ्यावी.
यामुळे टोमॅटो पिकांची संतुलित वाढ होते, पाने हिरवीगार होतात, फुटव्यांची संख्या वाढते. दोन पानांमधील व दोन फुटव्यांमधील अंतर मर्यादित राहते. फुलांची व फळांची संख्या वाढते. फळांचे पोषण व्यवस्थित होते. मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. फुलगळ होत नाही, फळाला डाग पडू देत नाही, एकंदरीत फळांचा विकास चांगला होतो फळे चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.
टोमॅटो पिकांतील या कालावधीत फवारणीमध्ये निमकरंज किंवा निमगार्ड 1.25 मिली अधिक अलीका 0.5 मिली किंवा धानुसान + अँट्रोकॉल 2 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड किंवा साफ 2 ग्रॅम + न्युट्रिमिक्स 1 ग्रॅम + ग्रोथ मास्टर 2.5 मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन सायंकाळी 5 ते 6 च्या नंतर फवारणी घ्यावी. वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, पानांवरील काळे ठीपके, मिलीड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी मदत होते. पानांची रुंदी वाढून कार्यक्षमता वाढते. फळधारणेस व फळ पोषणांमध्ये मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन निघते. त्यामूळे टोमॅटो पिकांचे निरोगी पोषण होऊन उत्पन्नात वाढ होते.