अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर राहिलेल्या भाज्यांना चांगले दर मिळत होते. टोमॅटोला देखील चांगले दर मिळत होते. यानंतर मात्र आता हे दर कमी झाले आहेत. यामुळे आता केलेला खर्च देखील निघत नाही.
सध्या बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये कॅरेट असा आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, उत्पादन खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.
टोमॅटो मुंबई गुजरात, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंगलोर आदी ठिकाणी जातो. दिवाळीनंतर या बाजारपेठेमध्ये स्थानिक टोमॅटोची आवक वाढली. यामुळे दरात घसरण झाली आहे. याचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे.
दरम्यान, नाशिक बाजार समितीच्या पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डात नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी, संगमनेर आदी भागातून टोमॅटोची आवक होत असते. परिसरात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत. सर्वसाधारण ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची आवक सुरू झाली.
सुरवातीस सर्वसाधारण दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळत होता. सप्टेंबर महिन्यात बाजारभाव चारशे ते पाचशे रुपये होता. ऑक्टोबर महिन्यात हेच दर 1000 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र सध्या उत्पादन खर्च देखील निघत नाही.