साप थंड रक्ताचे असतात. त्यामुळे, बाहेर थंड असेल तर ते आपल्या शरीराचं तापमान वाढवून क्रियाशील राहू शकत नाहीत.
साप चावण्याचे प्रकारः कोब्रा आणि फुरसे या दोन जाती मानवासाठी सर्वात विषारी आहेत.
साप चावण्याची लक्षणे
विषारी साप चावल्याने अनेक प्रभाव होतात, त्यामधे साध्या जखमा ते जीवघेणे आजार आणि मृत्यु यांचा समावेश असतो. साप चावल्यानंतर दिसणारी लक्षणे दिशाभूल करु शकतात. रुग्णाला प्रारंभी लक्षणीय लक्षणे दिसतात, आणि नंतर अचानक श्वास घ्यायला त्रास होतो आणि शॉक बसतो.
सापाची विषबाधा होण्याची चिन्हे आणि लक्षणे
- स्थानिक प्रभावः फुरसे आणि काही कोब्राचे चावे वेदनादायक असतात. तिथे भरपूर सूज येते आणि रक्तस्त्राव आणि फोड येतात. काही कोब्रांचे विष चाव्याच्या ठिकाणच्या उतींना नष्ट करते.
- रक्तस्त्रावः फुरशाच्या चाव्याने अंतर्गत अवयवांमधे जसे, मेंदू किंवा पोटात रक्तस्त्राव होतो. रुग्णाला जखमेच्या ठिकाणी किंवा तोंडातून किंवा जुन्या जखमेच्या ठिकाणाहून रक्तस्त्राव होऊ शकतो. त्यावर उपचार न केल्यास शॉक किंवा मृत्यु येऊ शकतो.
- चेता संस्थेवर प्रभावः ठराविक सापांच्या चाव्याने थेट चेतासंस्थेवर परिणाम होतो. श्वसनाच्या स्नायूंचे कार्य थांबते, त्यामुळे उपचारापूर्वीचे मृत्यु येतो. प्रारंभी, रुग्णाला दिसणे, बोलणे आणि श्वसनाचा त्रास होऊ शकतो आणि बधीरता येते.
- स्नायू निकामी होणेः ठराविक सापांच्या विषाने शरीराच्या अनेक भागात थेट स्नायूंची हालचाल बंद पडते. मेलेल्या स्नायूच्या पेशींच्या कच-याने मूत्रपिंड भरुन जातात. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते.
- डोळेः विष थुंकणारे कोब्रा हे थेट डोळ्यात विष फेकू शकतात, त्यामुळे डोळ्यांना इजा आणि नुकसान होते.
वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी
चावलेला साप हा बिनविषारी आहे हे हमखास माहिती असेल तर, अन्यथा रुग्णाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करावे. साप ओळखण्यात चूक झाली तर जीवघेणी चूक होऊ शकते.
बिनविषारी सापांनी केलेल्या जखमेची चांगली काळजी घ्यावी लागते. रुग्णाने गेल्या पाच वर्षात धनुर्वाताचे इंजेक्शन घेतले नसल्यास त्याला एक बूस्टर डोस देण्यात यावा.