कर्जत जामखेड हा परतीच्या पावसाचा तालुका. तूर पिकासाठी परतीचा पाऊस अनुकूल ठरतो. तालुक्यात तूरीचे सिंगल पीक घेतले जाते – आंतरपीक नसते… ‘महासिड्स’चे विठ्ठलराव पिसाळ सांगतात, की आमच्या कर्जत जामखेडमध्ये तुरीला उसासारखा दर्जा आहे. मोठे भुधारक एकठोक तुरीचे पीक घेतात. दोन-तीन वर्षांपासून वाण बदलाने एकरी एक दोन क्विंटलने उत्पादकता वाढली आहे. तालुक्यात BDN716 वाणाचे क्षेत्र 80 टक्क्यापर्यंत वाढलेय. पीक कापणीच्या प्रयोगानुसारही कर्जत जामखेडमध्ये उत्पादकता वाढल्याचे दिसतेय. थोडक्यात, तुरीच्या उत्पादकता घटीला कर्जत जामखेड सारखे काही भाग अपवाद ठरताहेत.
वाण बदलाचे प्रयोग व परतीचा पाऊस इथे तुरीला अनुकूल ठरतेय. आजघडीला क्विंटलला सहा हजार भाव निराशाजनक आहे, पण तुरीला कर्जत जामखेडमध्ये तरी दुसरा पर्याय नाही. यंदा दहा-पंधरा टक्के क्षेत्र घटले तर त्याची जागा कपाशी घेवू शकतो, असे श्री. पिसाळ यांनी कळवले आहे.
थोडक्यात भौगोलिक परिस्थिती व सुधारित पीक पद्धतीनुसार एखादे पीक परडवण्याचे परिमाण बदलतात. वरील पोस्टच्या आधी लिहिलेली पोस्ट पुढीलप्रमाणे—
“येत्या खरिपात आंतरपीक म्हणून तूर घेणार नाही. कारण – दोन वर्षांपासून एकरी उत्पादकतेत मोठी घट होतेय. दोन-तीन क्विंटल उतारा येतोय, … आंतरपिक घेतल्याने पुढे रब्बीचे पीक घेता येत नाही, त्यामुळे आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. आणि एवढे होवूनही तुरीला रेटही चांगले मिळत नाहीत.”
– खामगाव भागातील शेतकऱ्याचे मनोगत.
—
देगलूर तालुक्यात रब्बी हंगामात धना व चना पीक घेता यावे यासाठी तूर पिकाला फाटा देणार असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले होते.
—
साभार: Deepak Chavan, 8 May 2022
#नोंदी #तूर
#पीकपाणी