जनावरांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वर्षभर हिरवा चारा पुरविणं आवश्यक असत.
मुरघास खाऊ घातल्यानं. जनावरांना आपण फक्त हिरवा चाराच देत नाही तर. त्यातील पोषण मुल्यांच जतन करून उलट काहीसं वाढवूनच देत असतो.
शेतात उभ्या असलेल्या चारा पिकाचा मुरघास बनवून हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढू शकतो. असं केल्यानं लागवडीखालील क्षेत्राच्या वापरावर मर्यादा येणार नाहीत.
अतिरिक्त हिरव्या चाऱ्याच उत्पादन होत असल्यास, त्या चाऱ्यापासून मुरघास बनवून चारा टंचाईच्या काळात मुरघास वापरता येतो.
मुरघास बनविण्यासाठी शक्यतो एकदल पिकांची निवड करावी. कारण, त्यामध्ये कर्बोदके आणि साखरेच प्रमाण जास्त असत.
मुरघास बनविण्यासाठी उपयुक्त चारापीकं
सर्व हिरव्या चाऱ्याचा मुरघास तयार करता येतो. मात्र, द्विदल वर्गातील पिकांचा मुरघास तयार करताना त्यात एकदलवर्गीय पिकाचा ६० ते ७० टक्के समावेश करणे आवश्यक आहे.
बहुतेक सर्व तृणधान्य चारापिकापासून उत्तम मुरघास तयार होतो. ज्वारी आणि मका तर उत्तमच; परंतु उसाचे वाढे, बाजरी, नागली, गिनीगवत, हत्तीगवत, पॅरागवत इत्यांदी चारा पिकापासूनही चांगला मुरघास तयार होतो.
चाऱ्याची कापणी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण सर्वसाधारणपणे ६५ ते ७० टक्के असाव.
विविध चारापिकांच्या कापणीची योग्य वेळ
मका – पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना, पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
ज्वारी – पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना पेरणीनंतर ५० ते ६० दिवसांनी कापणी करावी.
बाजरी – पीक ५० टक्के फुलोऱ्यामध्ये असताना सर्वसाधारपणे पेरणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी कापणी करावी.
ओट – पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी कापणी करावी.
बहुवार्षीक चारापिके – हत्ती गवताच्या प्रजाती जसे कि यशवंत, जयवंत, गुणवंत, संपूर्ण इ. गिनी गवत सर्वसाधारण पहिली कापणी पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांनी व त्यानंतरच्या कापण्या प्रत्येकी ३० ते ४० दिवसांनी कराव्यात.