लसीकरण हा सर्वात प्रभावी रोगप्रतिबंधात्मक उपाय आहे. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांसारखे पाळीव प्राणी साथीच्या रोगाने दगावतात.
हे रोग झाल्यानंतर पशुधन वाचण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून साथीच्या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरण करणे आवश्यक असते. त्यासाठी पशुपालकांनी जनावरांचे वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील जनावरांना बरेच आजार होतात. यापैकी घटसर्प, फऱ्या या जनावरांतील गंभीर आजारांचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर जनावरांना पावसाळ्यापुर्वीच लसीकरण करुन घ्यावे.
पावसाळ्यात जनावरांना विशेषत: म्हशींना घटसर्प रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. या रोगात जनावरांना ताप येते. श्वास घेण्यासाठी त्रास होतो.
जनावरांच्या घशातून खरखर आवाज येतो.
जनावर चारा खात नाही. यामुळे एका दिवसातच जनावराचा मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावराला एप्रिल – मे मध्ये घटसर्प रोगासाठी प्रतिबंधात्मक लसिकरण करुन घ्यावे.
फऱ्या
फऱ्या हा आजार गायी आणि म्हशींतील जीवाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे जनावरे लंगडत असल्याने या आजाराला एक टांग्या असेही म्हणतात. सहा ते चोवीस वर्ष वयोगटाच्या धष्ट पुष्ट जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
या आजारामध्ये सुरवातीला जनावरांना ताप येतो. जनावरे मलूल आणि क्षीण होतात. भूक मंदावते, छाती, मान, खांदा, कंबर आणि मागील पायाच्या जाड स्नायूंवर तीव्र सूज येते.
हा आजार होऊ नये यासाठी लसीकरण केल्यास उपचारावर होणारा खर्च, जनावरांना होणारा त्रास आणि मरतुक वाचवू शकतो. त्यामुळे जनावराला एप्रिल – मे मध्ये घटसर्प रोगासाठी प्रतिबंधात्मक लसिकरण करुन घ्यावे.
आजाराचा प्रादुर्भाव मेंढ्यामध्ये सुद्धा दिसून येत असल्याने गाभण मेंढ्यामध्ये प्रसूतीच्या एक महिने आधी लसीकरण करावे. तीन महिने वयाच्या कोकरांमध्ये सुद्धा लसीकरण करावे.
फाशी
या आजाराला काळपुळी असेही म्हणतात. या आजारात काही लक्षणे दाखवण्यापूर्वीच जनावरे तडफडून मरून जातात. या आजारात जनावराला ताप येतो. पोटात त्रास होतो. जनावर थरथर कापते. जनावराचे पोट फुगते. Animal Vaccination
तोंड, नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होतो. आजारी जनावराचे रक्त गोठत नाही. आजाराचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर सर्व जनावरांना पावसाळ्यापूर्वी लसीकरण करावे.