नमस्कार शेतकरी बंधूनो,सध्या सर्वच भागात टोमॅटो पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. वातावरणातील सतत होणारे बदल, आर्द्रता, उष्णता याचा परिणाम म्हणून रसशोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव दिसून येतो आहे. टोमॅटो पिकांबरोबरच ईतरही पिकांमध्ये पांढरी माशीचा खुप मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे बदलत्या वातावरणाबरोबरच दिवसेंदिवस कमी होत चाललेली जमिनिची सुपिकता आणि यामुळेच कमी होत असलेली पिकांची ही रोगप्रतिकारक क्षमता त्यामुळे सर्वच प्रकारच्या रसशोषक किडींचा सर्वच पिकांवर वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे.
ओळख व लक्षणे :- पांढरी माशी ही कीड टोमॅटो, मिरची, वांगी, कोबी व फळ पिकांवर आढळते. या किडींचा आकार ०.५ मिमी पेक्षा कमी असतो. रंग भुरकट पांढरा व डोळ्याचा रंग लाल असतो. या किडींच्या पंखावर पांढरी भुकटी असते. कोष व किडींचा आकार फुगीर, गोलाकार असतो. पिल्ले व प्रौढ शरीरावर केस असतात. ही कीड पिल्ले व प्रौढ या दोन्ही अवस्थेत पानांतील रसशोषण करते. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो. या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते व फल धारणा होत नाही.

जीवनक्रम :- 30 दिवसांचा ( अंडी, पिले, कोष आणि प्रौढ ) पांढरी माशी किडीची मादी पानांच्या खालच्या बाजूला 150 ते 200 पर्यंत अंडी घालते. १० दिवसात अंडी उबवून त्यातुन पिल्ले बाहेर पडतात. ही पिल्ले योग्य वास्तव्य शोधण्यासाठी झाडावर भटकतात. वास्तव्य निश्चीत झाल्यावर वनस्पतीच्या पेशिजलात आपली सोंड खुपसून त्यातील रस शोषण करतात. या किडीची पूर्ण वाढ ७० ते ७५ दिवसात होते. वाढ झालेली कीड कोषावस्थेत जाते. ही अवस्था १६० दिवस असते. त्यातुन नंतर पांढरी माशी बाहेर पडते.

प्रादुर्भावाची लक्षणे :-
पानांच्या कडा खालील बाजूस वळतात. तसेच पाने पिवळी पडतात.
नुकसानाचे प्रकार व तीव्रता :-
पिले आणि प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. तसेच पांढर्या माशीच्या शरीरातून बाहेर पडणार्या पारदर्शक चिकट द्रवावर काळ्या बुरशीची वाढ होते.
ही कीड पर्णगुच्छ ( लीफकर्ल ) या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.
एकात्मिक किड नियंत्रण :-
जैविक नियंत्रण :-
बिव्हेरिया बसियाना + व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझिम अॅनीसोपली या जैविक उत्पादनाची 4 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
सेंद्रिय नियंत्रण :-
निमगार्ड (10000ppm) किंवा गार्डप्लस किंवा निमकरंज अधिक फ़िश ऑईल या सेंद्रिय कीटकनाशकांची 1.5 मिली प्रति लीटर पाणी यांप्रमाणे दर 7 ते 10 दिवसाच्या कालावधीत फवारणी घ्यावी.
रासायनिक नियंत्रण :-
1) रोपवाटिकेत रोपे उगवल्यानंतर इमिडाक्लोप्रिड 0.5 मिली अधिक कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी यांप्रमाणे फवारणीसाठी वापर करावा.
2) पुर्नलागवडीवेळी रोपांची मुळे खालील औषधांच्या द्रावणात बुडवावीत. फिप्रोनिल (5% SC) 1.5 मिली किंवा थायामेथोक्झाम ( 25% WG) 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी यांप्रमाणे घ्यावे.
3) लागवडीनंतर फळे येण्यापूर्वी डायफेन्थ्युराॅन ( 50 पी.डब्ल्यू.पी. ) 1 ग्रॅम किंवा फेनप्रोपॅथ्रिन ( 30 ईसी ) 1 मिली. प्रति लिटर पाणी यांप्रमाणे फवारणीसाठी घ्यावे.
4) लागवडीनंतर थायमेथोक्झाम ( 25% WG ) 0.4 ग्रॅम किंवा डायमेथोएट ( 30% EC) 1 मिली प्रति लिटर पाणी यांप्रमाणे फवारणी घ्यावे.
अन्य उपाय :-
1) जमीनीची सुपिकता वाढविन्याच्या दृष्टीने जमिनीची मशागत व खत व्यवस्थापन व्यवस्थीत रित्या करावे. पिकांस संतुलित खते देऊन पिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवावी. नत्रयुक्त खतांचा अतिवापर टाळून, संतुलित वापर करावा.
2) पुर्नलागवडीच्या वेळी मुख्य पिकांच्या कडेने पाच ते सहा ओळी मका, चवळी आणि झेंडू लावावा.
3) निंबोळी पेंड हेक्टरी 400 ते 500 किलो या प्रमाणात जमिनीत / मातीत मिसळून वापरावी.
4) पिवळ्या व निळ्या रंगाचे चिकट सापळे प्रति एकरी 10 ते 20 याप्रमाणे लावावेत.
5) पांढरा, पिवळा, काळा किंवा निळ्या रंगाचे प्लॅस्टिक मल्चिंग केल्यास पांढर्या माशीचे प्रमाण कमी राहते…!!!✍
🙏🍓🍎🥭🍊🍇 शेतकरी हितार्थ 🍇🍊🥭🍎🍅🙏
—-
🍎🍇🍇🦚 !! अन्नदाता सुखी भव: !! 🦚🍇🍇🍎
काळजी घ्या…आपला जिव्हाळा कायम राहो…
साभार : ✍श्री.सतिश भोसले @09762064141. Founder & CEO, KRUSHIWALA FARMER’S GROUP
Mob No.: 09762064141

