भारतातील गोवंशाचे मारेकरी कोण? खरं म्हणजे आपणच जबाबदार आहोत.
आपण गाईचं दूध सर्वत्र वापरत होतो. गवळी आपल्याकडे दूध पोचवत होता हळूहळू आपण त्याच्यावर ते अविश्वास दाखवून (पाणी टाकून दुध देतात)सरकारी व्यवस्थेतील पाकिटातलं (पाश्चराइज् म्हणजे मी नेहमी म्हणत असे पाश्चात्यांचं दुध) दूध घ्यायला सुरुवात केली व आज आपण हल्दीराम, अमूल, गोकुळ, इत्यादी सारख्या अनेक कंपन्यांच दूध शहरांमध्ये तालुका स्तरावर व आता तर ग्रामीण मध्ये वापरतो आहे.गाईंची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना आम्हाला दुग्धजन्य पदार्थ कुठून पुरविण्यात येतात हा मोठा प्रश्न आहे.या सर्व कंपन्या श्रीमंत झाल्या व यांना दूध देणारा आज गरीब आहे हे लक्षात घ्यावे.
या मध्ये जो रक्षण करणारा गवळी होता त्याच्यावरते जो अविश्वास आपण दाखवला त्यामुळे परिणाम झाला हे मान्य करावे लागेल. हळूहळू गाईंची संख्या कमी होऊ लागली शेतकऱ्यांनी आपल्याकडे काही प्रमाणातल्या गाई विकायला सुरुवात केली कारण त्यांच्यासाठी शेतीत तयार होणारी ज्वारी ते लावत लावत होते तेव्हा ज्वारी आपल्यासाठी व कुटार गाई साठी करत होतो.आता लावेनासे झाले.आता तो कडबा विकत आणून गाईंना देणं परवडेनासे झालं.
सोयाबीन ने आपला घात केला कारण की सोयाबीन कुटार म्हणून चालत नव्हता त्यामुळे गाईला ठेवणं कठीण झाले त्यामुळे गाई विकणे सुरू झाले.त्यामुळे गाई कसायाकडे गेल्या, कसाया कडून आज मोठ्या इंडस्ट्रीमध्ये त्याचं रूपांतरण झालं आहे त्याकरता गौवध बंदी हा उपाय आहे कारण की आपल्या गाईचे व शेताचे नातं आहे.गाईची अत्यंत आवश्यकता आहे नाहीतर उद्याचा दिवस काही चांगला नाही.
कोणावर ते दोषारोपण करून काही उपयोग नाही असे वाटतं मी व मित्र मंडळींनकडे गेल्या चाळीस वर्षापासून माझ्या घरी सातत्याने कटाक्षाने गाईचं दूध घेत आहे व त्याकरता वर्षाच्या अगोदर माझ्यासाठी गाई विकत घ्यायला गवळ्याला पैसे देत असतो व वर्षभर दूध त्या माध्यमातून माझ्या घरी व माझ्या आजूबाजूच्या घरी पोचवण्याचा कार्यक्रम मी अनेक वर्षापासून करीत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना देखील त्याचा फायदा मिळत आहे अपवादात्मक स्थितीत पाकिटातलं दूध आणावं लागतं.
लेखन : ओलावाफाऊंडेशन
फोटो : पवारगोठा