भारतात मागील हंगामात १३५ लाख टन हरभरा उत्पादन झाले होते. देशातील उत्पादनाचा हा विक्रम होता. यंदा सरकराने यापुढे जाऊन १३६ लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाज जाहीर केला.
पण गेल्यावर्षी साध्य झाले ते यंदा कठिण वाटत आहे. यंदा फेब्रुवारीपासूनच वाढलेली उष्णता उत्पादन वाढीच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहे.
गेल्या काही वर्षांचा ट्रेन्ड पाहता भारतात हरभरा उत्पादन वाढतच गेल्याचे दिसते. देशात २०१६-१७ मध्ये हरभरा उत्पादन जवळपास ९४ लाख टन होते. तर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये हरभरा उत्पादनाने ११३.८ लाख टनांचा टप्पा गाठला.
मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी उत्पादन पुन्हा घटले. मात्र त्यानंतर उत्पादनात सतत वाढच होत गेली. २०२०-२१ मध्ये उत्पादनाने ११९ लाख टनांचा टप्पा गाठला होता.