नियमित पीककर्ज फेड करणार्या शेतकर्यांना राज्य शासनाने 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात कागदोपत्री कार्यवाही सुरू झाली असून सुमारे 10 हजार कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे. लवकर हे अनुदान शेतकर्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सन 2017 -18, सन 2018 – 19 व सन 2019 -20 या तीन वर्षात नियमित पीककर्ज फेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून राज्य शासनाने जाहीर केले आहे.
मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी चालू आर्थिक वर्ष हे महिला सबलीकरण वर्ष म्हणून जाहीर केले आहे. तसेच नियमित कर्ज फेड करणार्या महिला शेतकर्यांना 75 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केलेले आहे. याबाबत महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पानसरे म्हणाले कि पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परत फेड करणार्या महिला शेतकर्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या प्रमाणे सदर महिला सभासदांना 75 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे.तसे आदेश काढण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या महिलांकडून करण्यात येत आहे.
प्रमोद पानसरे, ओतूर.
पुणे जिल्हा अध्यक्ष
महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटना
फोटो क्रेडिट : world bank

