(Bark eating caterpillar) इन्डरबेला क्वाड्रीनोटेटा हे तिचे शास्त्रीय नाव असून लेपिडोप्टेरा या कुळातील आहे हि अळी डाळिंब, पेरू, आंबा, बोर, आंबा, आंवळा, लिंब इत्यादी बागायती पिकांचे नुकसान करते.
जीवनक्रम:
फिकट तपकिरी रंगाची मादी पतंग सालातील चिरा आणि छिद्रात अंडी घालते. अंड्यातून आठ ते दहा दिवसानंतर लालसर तपकिरी डोके असलेले अळी बाहेर पडते अळीचा कालावधी ९ – १० महिन्यांपर्यंत असु शकतो त्यानंतर अळी त्या बोगद्यात २५ दिवस पर्यंत कोषावस्थेत असते त्यानंतर कोषातून पतंग बाहेर पडतात ते अल्पायुषी असतात वर्षभरात एक पिढी पूर्ण होते.
नुकसानीचा प्रकार:
साल खाणाऱ्या अळीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष आणि प्रौढ या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था सर्वात नुकसानकारक असते.अळी खोडावर किंवा फांदीवर एक छिद्र करते दिवसा ती छिद्राच्या आतील बाजूस लपते आणि रात्रीच्या वेळी झाडाची साल व त्यातील हरितद्रव्ये खाते
अळी रेशमी जाळे तयार करते ज्यामध्ये त्यांचे मलमूत्र आणि चावलेल्या लाकडाचे कण असतात ते झाडाच्या सालीवर सैलपणे चिकटलेले असतात.
उपाययोजना :
१) साधारणपणे प्रादुर्भाव जुन्या झाडांवर जास्त असतो.
२) स्वच्छ व नीट बागेची देखभाल करा आणि झाडांची नियमित छाटणी करा.
३) या किडीने जास्त प्रादुर्भाव झालेल्या फांद्या कापून नष्ट करा.
४) अळीने बनवलेले जाळे झाडाच्या खोडातून आणि फांद्यांमधून काढा.
५) अळीने केलेल्या छिद्रात
लोखंडी गज टाका अन् अळीला मारून टाका.
६) छिद्रांमध्ये आवश्यकतेनुसार रॉकेल मिश्रित शेण/ मातीने लिपून बंद करा
७) प्रादुर्भाव गंभीर असल्यास कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट झाडाच्या खोडावर लावावी.
८) प्रादुर्भाव कमी झाला नसल्यास खोडावरील मलमुत्राचे जाळे काढून टाकल्यानंतर झाडाच्या खोडावर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करा.
प्रा. अमोल ढोरमारे ( कीटकशास्त्रज्ञ तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विधाका शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वडवणी)