हवामान विभागाकडून यूपी-उत्तराखंडसह २० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नोरू चक्रीवादळामुळे पाऊस भारतात महिनाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच परतीच्या वाटेवर असलेला मान्सून, अद्याप उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये सातत्याने कोसळत आहे. हवामान विभागाकडून यूपी-उत्तराखंडसह २० राज्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नोरू चक्रीवादळामुळे पाऊस भारतात महिनाभर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
चक्रीवादळचा प्रभाव ओसरत असला तरी, चक्रीवादळाचे ठिकाण पुढचे काही दिवस जिथे आहे तिथेच रहाणार आहे. नैऋत्य मान्सून माघारीच्या वाटेवर असताना हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. यामुळे मध्य भारत आणि पश्चिम भारताच्या पश्चिम भागात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.
दसऱ्यापासून संपूर्ण भारतात सुरू झालेल्या पावसाने दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये पूरपरिस्थीती उद्भवली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.