सध्या पिवळ्या कलिंगडाला मोठी मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील युवा शेतकरी संजय रोडे यांनी पारंपरिक शेती न करता पिवळ्या रंगांच्या कलिंगडाची लागवड केली आहे
या शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग यानिमित्ताने केला आहे. हे कलिंगड दिसायला वेगळं असल्यानं याला जास्त दर मिळत आहे. विशेष म्हणजे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केल्यानं त्यांना यातून शाश्वत दर मिळाला आहे.
युवा शेतकरी संजय रोडे यांनी पारंपरिक शेती न करता पिवळ्या रंगांच्या कलिंगडाची लागवड केली आहे. त्यांनी दीड एकर शेतात आरोही, विशाला आणि सरस्वती या वाणाच्या कलिंगडाची लागवड केली आहे. दीड एकरात त्यांनी 12 हजार रोपे लावली आहेत.
दरम्यान, यासाठी त्यांना 70 ते 75 हजारांचा खर्च आला आहे. यासाठी त्यांनी एका खासगी कंपनीसोबत कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. या कलिंगडावर खूप कमी प्रमाणात रासायनिक औषधांचा वापर करावा लागत असल्याचे शैलेश ढवळे यांनी सांगितले. यामुळे हे फायदेशीर आहे.
यामुळे या कलिंगडाची लागवड केल्यास पारंपरिक पिकापेक्षा अधिक फायदा होऊ शकतो. यामुळे सध्या या शेतकऱ्याची चर्चा सुरू आहे. दिसायला वेगळेपण असल्यानं या कलिंगडांना शहरी भागात अधिक मागणी असते.