Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

June 22, 2026

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » परतीच्या पावसाचे थैमान कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती, तर मुंबईसह उपनगरात येलो अलर्ट
हवामान

परतीच्या पावसाचे थैमान कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती, तर मुंबईसह उपनगरात येलो अलर्ट

Neha SharmaBy Neha SharmaOctober 11, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज(दि.11) तारखेपासून परतीचा पाऊस असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. परंतु मागच्या काल पासून सुरू झालेल्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात मुंबईसह उपनगरात काल(दि.10) पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. परंतु मुंबई परिसरात पाऊस झाला नाही परंतु कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. दरम्यान आज पहाटे पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने रस्ते बंद झाले आहेत.

दरम्यान काल मुंबई परिसरात पाऊस झाला नसला तरी वातावरणात दमटपणा होता. यामुळे मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी आणि बुधवारीही मुंबईमध्ये यलो अॅलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसाने मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये मंगळवार आणि बुधवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

विदर्भातील पावसाचे प्रमाण मंगळवारनंतर कमी होईल. पालघर, ठाणे, मुंबई येथे शुक्रवारी कोरड्या वातावरणाचीही शक्यता आहे. प्रणालीचा प्रभाव कमी झाल्यानंतर वातावरणीय घटक लक्षात घेऊन मग नैऋत्य मौसमी पावसाची माघारही जाहीर होऊ शकते, असा अंदाज आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt

ताज्या बातम्या June 22, 2026

Pin Up – Azərbaycanın ən yaxşı kazinosu | Rəsmi sayt ▶️ OYNA Содержимое Pin Up…

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.