पुणे जिल्ह्यास आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ’वैयक्तिक शेततळे’ या घटकासाठी सुमारे 4 कोटी 80 लाख रूपये अनुदानाची रक्कम देण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यांसाठी कमाल 75 हजार रुपये रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली. मुख्यमंत्री कृषि सिंचन र्गत ‘वैयक्तिक शेततळे’ घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या www. mahadbtmahait. gov. in या संकेतस्थळावर ऑनलाईनरित्या अर्ज करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
महाडीबीटीच्या संकेतस्थळावर ‘वैयक्तिक शेततळे’ ही बाब कार्यान्वित करण्यात आलेली असून याकरिता शेतकर्यांनी अर्ज करतांना ‘सिंचन साधने व सुविधा’ या टॅबअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’ या बाबीची निवड करावी. त्यानंतर ‘इनलेट आणि आऊटलेटसह’ किंवा ‘इनलेट आणि आऊटलेट शिवाय’ यापैकी एका उपघटकाची निवड करावी. त्यानंतर ‘शेततळ्याचे आकारमान’ व ‘स्लोप’ ची निवड करावी. अर्ज भरल्यानंतर
महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी
पद्धतीने लाभार्थी निवडीची कार्यवाही करण्यात येणार आहे. तरी शेतकर्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या मंडल कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही काटकर यांनी केले आहे.