भारतातील घराघरांत स्वयंपाकाला चवीची फोडणी देणारा घटक म्हणजे जिरा (Cumin Seeds). महाराष्ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे. सध्या या जिऱ्याच्या किंमती चांगल्या तडतडल्यात.
देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत.