Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 29, 2026

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ? सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
शेतीविषयक

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ? सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित

Neha SharmaBy Neha SharmaApril 6, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अतिवृष्टी ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये २४ तासात ६५ मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मंडळातील सर्व गावांमध्ये शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातात. शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्केपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने अनुदान स्वरुपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मात्र, महसूली मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नसतानाही मंडळातील गावांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि त्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. तसेच काही गावांमध्ये सलग काही दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे देखील शेतीपिकांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रकरणी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे, या भूमिकेतून नवा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित बैठकीत, सततच्या पावसाची सध्या कोणतीही परिभाषा नसल्याने आणि ती निश्चित करणे आवश्यक असल्याने, शेतीपिकांचे नुकसान झालेल्या योग्य शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावाकरिता योग्य निकष निश्चित करण्यासाठी कृषी विभागाने समिती नियुक्ती करावी असा निर्णय झाला होता. त्यानुसार सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासाठी योग्य निकष निश्चित करून शासनास शिफारशी करण्यासाठी कृषी आणि पदुम विभागाच्या २१ डिसेंबर २०२२ च्या शासन आदेशाद्वारे अपर मुख्य सचिव (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती.

या समितीने सततच्या पावसासाठी निकष निश्चित करण्याबाबत तयार केलेल्या अहवालात शेतीपिकांच्या नुकसानीकरिता विहित दराने मदत देण्याकरिता सततच्या पावसासाठी काही निकष सुचविले होते. हा अहवाल आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

नेमका निर्णय काय ?

दि. १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत महसूल मंडळामध्ये सलग पाच दिवसाच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान १० मि.मी पाऊस झाल्यास; आणि त्याच महसूल मंडळात या कालावधीत मागील १० वर्षाच्या (दुष्काळी वर्ष वगळून) सरासरी पर्जन्यामानच्या तुलनेत ५० टक्के (दीडपट) किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास, सततच्या पावसाचा पहिला ट्रीगर लागू राहील.

अशा महसूल मंडळामध्ये पहिला ट्रीगर लागू झाल्याच्या दिनांकापासून १५ व्या दिवसापर्यंत सामान्यकृत वनस्पती निर्देशांक (NDVI) निकष पुढीलप्रमाणे तपासण्यात येतील. १५ जुलै ते १५ ऑक्टोबर या कालावधीत खरीप पिकांचे सामान्यकृत वनस्पती निर्देशांक फरक (NDVI) जर ०.५ किंवा त्यापेक्षा कमी आल्यास, सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू राहील. तथापि ज्या तारखेला सतत पावसाची सुरुवात झाली त्या दिवसाचा NDVI हा १५ व्या दिवसाच्या NDVI पेक्षा जास्तच असायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

सततच्या पावसाचा दुसरा ट्रीगर लागू झालेल्या महसूल मंडळातील बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करुन पंचनामा करण्यात येईल आणि ३३ टक्के पेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाले असल्यास मदत देण्यात येईल. त्याचप्रमाणे, जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासनास प्राप्त झालेल्या सर्व प्रलंबित प्रस्तावांकरिता वरील निकष वापरून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या सुधारित दराने मदत देण्याचा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

कधी आणि कुठे होणार अवकाळी पाऊस ? 

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर इथं ६ एप्रिल (गुरुवार) रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

६ एप्रिलला मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली, परभणी इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. ६ एप्रिल रोजी विदर्भातील अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर ७ एप्रिलला (शुक्रवार) पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणं गरजेचं आहे.

तापमानात अचानक वाढ झाल्याने पावसाचा अंदाज

दरम्यान, तापमानातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळ अनेक ठिकाणी सरासरी तापमान ३५ अंश सेल्सिअस असल्याचं पाहायला मिळालं. हे वाढलेले तापमानही अवकाळी पावसासाठी मोठं कारण असणार आहे. इतकंच नाहीतर पुढील तीन-चार दिवस महाराष्ट्रातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

ताज्या बातम्या September 29, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up ▶️ ИГРАТЬ Содержимое…

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026

Mostbet Casino PT – Login no Casino Most Bet Portugal

September 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.