Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पीएम किसान योजनेचा ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी कृषि खातं राबवणार मोहीम
शेती वाडी

पीएम किसान योजनेचा ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांच्यासाठी कृषि खातं राबवणार मोहीम

Neha SharmaBy Neha SharmaAugust 10, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्या अलीकडेच वितरित झाला आहे. परंतु राज्यातील १२ लाख शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहिले. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न आदी त्रुटीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. या पुढे शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष मोहीम राज्यात १५ ऑगस्टपासून राबवली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून राज्यातील तहसीलदार, तालुक्याचे भूमिअभिलेख अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांची समिती गठित करण्यात आली आहे. भूमी अभिलेख अद्ययावत, ई-केवायसी, बँक खात्याला आधार संलग्न आदी त्रुटीमुळे राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे समितीच्या देखरेखीत ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सेवक यांना वंचित शेतकऱ्यांच्या नोंदणीतील त्रुटी शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य कृषी खात्यानं प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. Pm Kisan Scheme

या तिन्ही प्रकारच्या नोंदणी आणि अटींची पूर्तता एकत्रित आणि गतीनं करण्यासाठी मोहीम राबवली जाणार आहे. वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना शोध घेऊन त्यांच्या तिन्ही अटींची पूर्तता गाव पातळीवर ग्रामसेवक, तलाठी व कृषी सेवकाकडून करण्यात येणार आहे, असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला. परंतु १२ लाख शेतकरी पात्र असूनही भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत नसणे, ई-केवायसी नसणे तसेच बँक खात्याशी आधार संलग्न नसणे, या तीन कारणांनी वंचित राहिले.

राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यापूर्वी केंद्राच्या योजनेतून वंचित राहिलेल्या १२ लाख शेतकऱ्यांच्या सर्व अटींची पूर्तता करण्याचे आदेश मुंडे यांनी दिले आहेत. याबाबत कृषिमंत्री मुंडे यांनी कृषी विभागाच्या सचिवांना एक पत्र देऊन आवश्यक सूचना केल्या आहेत.

मोहीम यशस्वी झाल्यास राज्यातील या १२ लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ व राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचा असा दुहेरी लाभ मिळणार आहे.

राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व नमो किसान सन्मान योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न करत असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच जे पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत त्यांनी संनियंत्रण समितीशी संपर्क करून आपले केवायसी व अन्य अटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

ताज्या बातम्या August 8, 2026

1. El Pulso de una Experiencia de Juego RápidaCuando ingresas a Sava Spin, no estás…

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.