- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मुंबई – महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरीराजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुणे तर जलमय करुन टाकले आहे. तर दुसरीकडे पुन्हा एका चक्रीवादळाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे जनतेला अलर्ट केले पाहिजे. शिवाय धरणाचे पाणी सोडत असताना नदीकाठच्या लोकांनाही सतर्क केले पाहिजे आणि या घटनांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली. राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे…
राज्यात मागील आठवडाभरात पाऊस चांगलाच बरसला असून मागील 2-3 दिवसांत राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी बघायला मिळाली. काल देखील कोल्हापूर,मुंबई, ठाणे, पुणे, अहमदनगर, विदर्भ, सातारा-सांगलीत अधिक पाऊस झाला. पुढील 1-2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात परतीच्या पावसाने लोकांना हैराण केलं असून उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सूनने परतीचा प्रवास केल्याचं सांगितलं जातंय. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे . मका आणि सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाल्याचं समजत आहे यामुळे शेतकऱ्यांची आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त करत म्हटलं आहे की, येत्या 5 दिवसात…
PM Kisan Samman Nidhi : भारतातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. किसान सन्मान निधी योजने 12 व्या हप्त्याचे पैसे जारी करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील पीएम किसान सन्मान संमेलनादरम्यान 12 वा हप्ता जारी केला. या कार्यक्रमात मनसुख मांडविया, नरेंद्रसिंग तोमर उपस्थित होते. दिवाळी तोंडावर आल्यामुळे शेतकरी 12व्या हप्त्याच्या पैशाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा आज अखेर संपली. मोदी सरकार देशभरातील 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये ट्रान्सफर करण्यात आले. या शेतकऱ्यांना मिळणार लाभ 1. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी झाले नाहीत ते 12व्या हप्त्याच्या लाभापासून ते वंचित राहू शकतात. भारत सरकारने…
पी. सुब्बा राव हे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील रेमाले या गावचे शेतकरी आहेत. भात, कापूस, मिरची आदी पिकांमध्ये त्यांचे कौशल्य आहे. तेल्यामाड या पिकात त्यांनी भुईमुगाचे आंतरपीक घेतले आहे. तेल्यामाड पिकात लागवडीच्या सुरवातीच्या पाच वर्षांच्या काळात आंतरपिकांमधून त्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे. बागेला ठिबक सिंचन करून पाण्याची बचत साधली आहे. तुषार सिंचन पद्धतीचा वापर तेल्यामाड पिकाची चांगली वाढ होण्याच्या दृष्टीने प्रति झाड 50 किलो व्हर्मिकंपोस्टचा वापर सहा महिन्यांच्या दोन हप्त्यांमध्ये केला आहे. जे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात त्यांच्या तुलनेत सुब्बा राव यांना 20 टक्के उत्पादन अधिक मिळाले आहे. भुईमूग पिकासाठी त्यांनी तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला होता. त्यांना या…
गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा १५ ते २५ रुपये किलोने मिळत होता. लवकरच कांद्याचा जुना साठा संपणार असून, सध्याचा पुरवठा शेतकऱ्यांकडून नसून त्या साठ्यातून होत आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. किरकोळ बाजारात कांदा महागला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे भाव वाढले आहेत.…
राज्यात मुसळधार पावसाचे थैमान सुरुच आहे. मुसळधार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेला घास पावसाने हिरवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. बीडमध्येही मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यात ४ हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. पावसामुळे पोल्ट्री फार्मचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर पावसामुळे आमची पोल्ट्री तुडुंब भरल्याने पाच हजार कोंबड्या पाण्यात वाहून गेल्याचे पीडित शेतकरी खंडू झगडे यांनी सांगितले. आता फक्त काही 100 कोंबड्या उरल्या आहेत. याशिवाय कोंबड्यांना खाण्यासाठी 95 पोत्यांमध्ये भरलेले धान्यही पावसाच्या पाण्याने वाहून गेले. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. महिला शेतकऱ्याने तिचा त्रास सांगितला जिल्ह्यातील महिला शेतकरी कुसुमबाई झगडे म्हणाल्या की,…
सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये पुरवठा करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. जातिवंत वासरे, करडे यांची जलद वजन वाढ होऊ शकते. हंगामानुसार चारा पिकांची लागवड करावी. बहुतांशी पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ, मका,कडवळ असा चारा जनावरांना देतात. परंतु अशा चाऱ्यामधून शरीरपोषण व दुग्धोत्पादनासाठी असणारी पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते. यामुळे प्रतिलिटर दुग्धोत्पादन, प्रतिकिलो वजनवाढ यावरील खर्च वाढतो. चाऱ्यासाठी मका – चारा पिकासाठी मक्याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2 इ. जातींची पेरणी करावी. हेक्टरी 75 किलो बी वापरावे, पेरणीपूर्वी बियाण्यावर…
राज्यशासनाच्या महत्वाकांक्षी ई पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालया मार्फत 15 ऑगस्ट 2021 पासून संपुर्ण राज्यात करण्यात येत आहे. सध्या खरीप हंगाम 2022 हंगामाची ई. पीक पहाणीची कार्यावाही सूरु आहे. खरीप हंगाम 2022 च्या पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणी से 20.3 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध करून दिले आहे हि अंतिम तारीख निश्चित करून देण्यात आली होती. तथापि राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतक-यांना अदयापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करून मा. जमाबंदी आयुक्त सो. पुणे यांचे मान्यतेने मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरील ई- पिक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे…
गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी बटाटा, टोमॅटो, सिमला मिरची, शेवगा आणि मटारच्या भावात वाढ झाली. तर, घेवड्याच्या भावात घट झाली आहे. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या भाजी पाल्याच्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश, इंदौर येथून २ टेम्पो गाजर, गुजरात येथून ३ ते ४ टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून ४ ते ५ टेम्पो घेवडा तर मध्य प्रदेशातून लसणाची १२ ते १३ ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले…
शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सिताफळ दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 16/10/2022 पुणे लोकल क्विंटल 557 2000 10000 6000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 7 3000 4000 3500 रामटेक नं. १ क्विंटल 10 1800 2000 1900 15/10/2022 औरंगाबाद — क्विंटल 85 1500 4000 3250 श्रीरामपूर — क्विंटल 8 1500 2500 2000 सोलापूर लोकल क्विंटल 74 1000 10000 5500 नाशिक लोकल क्विंटल 44 1200 3500 2200 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 390 3000 6000 4500 जळगाव लोकल क्विंटल 20 2500 4500 3500 पुणे-मोशी लोकल…
