Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026

Paradise 8 Casino: Quick‑Play Slots and Instant Wins for the Modern Gambler

August 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » चारा पिकांची लागवड
पशु पालन

चारा पिकांची लागवड

Neha SharmaBy Neha SharmaOctober 17, 2022Updated:October 17, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सकस चाराउत्पादन केल्यास जास्तीत जास्त पोषणमूल्ये पुरवठा करून पशुखाद्यावरील खर्च कमी करता येतो. जातिवंत वासरे, करडे यांची जलद वजन वाढ होऊ शकते. हंगामानुसार चारा पिकांची लागवड करावी. बहुतांशी पशुपालक शेतातील दुय्यम पदार्थ, मका,कडवळ असा चारा जनावरांना देतात. परंतु अशा चाऱ्यामधून शरीरपोषण व दुग्धोत्पादनासाठी असणारी पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. त्यामुळे पशुखाद्याचे प्रमाण वाढवावे लागते. यामुळे प्रतिलिटर दुग्धोत्पादन, प्रतिकिलो वजनवाढ यावरील खर्च वाढतो.

चाऱ्यासाठी मका –

चारा पिकासाठी मक्‍याची पेरणी मार्च महिन्यात पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2 इ. जातींची पेरणी करावी. हेक्‍टरी 75 किलो बी वापरावे, पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.

पेरणीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाडी शेणखत, कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश तसेच 50 किलो नत्र पेरणीनंतर 30 दिवसांनी अशी खतांची मात्रा द्यावी.

प्रतिहेक्‍टरी 50 ते 60 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.

चाऱ्यासाठी ज्वारी –

चारा पिकासाठी ज्वारीची पेरणी पूर्ण करावी. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. चारा पिकासाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी, निळवा, एम.पी.चारी, एस.एस.जी. 59-3 या जाती निवडाव्यात. चारा पिकासाठी हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 25 ते 30 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र व 50 किलो स्फुरद व पेरणीनंतर 30 दिवसांनी 50 किलो नत्र अशी खतांची मात्रा द्यावी.

चाऱ्यासाठी बाजरी –

चाऱ्यासाठी बाजरीची पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे, चारा पिकासाठी बाजरीच्या जाएंट बाजरा, राजको बाजरा, वायफ बाजरा या वाणांची निवड करावी. हेक्‍टरी 10 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीच्यावेळी हेक्‍टरी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद व पेरणीनंतर 30 दिवसांनी 30 किलो नत्र अशी खतांची मात्रा द्यावी. प्रति हेक्‍टरी 45 ते 50 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.

संकरित नेपियर गवत –

मार्च अखेरपर्यंत पेरणी करावी. लागवड 90 सें.मी. x 60 सें.मी. अंतरावर करावी. फुले जयवंत (आर.बी.एन.13) किंवा यशवंत या वाणाची निवड करावी. हेक्‍टरी 25,000 ठोंब लागतात. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 30 ते 40 गाडी शेणखत/ कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्यावेळी 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 20 किलो पालाश तसेच 25 किलो नत्र प्रत्येक कापणीनंतर अशी खतांची मात्र द्यावी. प्रतिहेक्‍टरी 200 ते 250 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.

चाऱ्यासाठी चवळी –

चारा पिकासाठी चवळीची पेरणी एप्रिलपर्यंत करता येते. पेरणी करताना दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. पेरणीसाठी श्‍वेता, ईसी 4216, यूपीसी 5286 या वाणांची निवड करावी. हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यावर रायझोबियम जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी हेक्‍टरी 20 ते 25 गाडी शेणखत / कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे, पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद अशी खतांची मात्रा द्यावी. प्रतिहेक्‍टरी 30 ते 35 टन हिरवा चाऱ्याचे उत्पादन मिळते.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

ताज्या बातम्या August 7, 2026

1. Pulz rychlého hraní v VulkanKdyž se dostanete na homepage Vulkan, první věc, která vás…

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026

Paradise 8 Casino: Quick‑Play Slots and Instant Wins for the Modern Gambler

August 6, 2026

Zoom Casino – Fast‑Paced Gaming for Quick Wins and High‑Intensity Sessions

August 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.