- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
यंदाच्या गळीत हंगामासाठी घोडगंगा साखर कारखान्याचे साडेआठ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तसेच आ. अशोक पवार यांनी केले. न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आमदार पवार बोलत होते. कारखान्याचे ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाणीत उसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेचे माजी संचालक निवृत्ती गवारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मानसिंग पाचूंदकर, कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे, विश्वास कोहकडे, भानुदास फराटे, शंकर फराटे, कारखान्याचे संचालक…
पुढील ३-४ दिवसांत वायव्य आणि मध्य भारतातील आणखी काही भागांतून मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. उत्तर अंदमान समुद्रावर एक चक्रवाती परिवलन कमी उष्णकटिबंधीय पातळीत आहे आणि पुढील २-३ दिवसांत ते पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रासह, कोकण, गोवा आणि राज्यातील इतर भागांत पाऊस पडत आहे. दरम्यान, आज गुरुवार (दि.१३) हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर आणि विदर्भासाठी यलो अलर्ट दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाचे धुमशान सुरु आहे. यामुळे नदी, नाले भरून वाहत आहेत. सध्या खरीप पिकांची कापणी सुरु आहे. पण पावसामुळे शेतीची कामे थांबली असून अनेक…
नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून; खरीप हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यादृष्टीने आज कृषी विभागाच्या भरारी पथकाकडुन दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील नंदिनी किचन ॲप्लिकेशन प्रा. लि. यांच्या आवरात बनावट किटकनाकाचा साठा असल्याचा संशय कृषी विभागाला आल्यामुळे तात्काळ कारवाई केली. अधिकृत किटकनाशके विक्रेते यांचे व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट किटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. कृषी विभागाने (नाशिक) सापळा रचून विभागीय कृषी सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे, तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नितेंद्र पानपाटील (विभागीय गुणवत्ता नियंत्रण…
दिवसेंदिवस वाढणारी महागाई सामान्यांचा जीव आणखी मेटाकुटीला आणत आहे. सणासुदीच्या दिवसात जेव्हा सामान्य ग्राहकांची खरेदी वाढते तेव्हा जर महागाईच्या भस्मासुराने तोंड उघडले तर सामान्य ग्राहक अगदी मोडून पडतो. अगदी सणासुदीच्या तोंडावर असेच घडले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार नुसार किरकोळ महागाई दरात ७.४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये ७.४१ वाढ नोंदवली गेली. मागील पाच महिन्यात हा महागाई दरचा उच्चांक आहे. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये सामन्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. सरकारने याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर केली हा सलग ९ वा महिना आहे जेव्हा महागाईचे आकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) 2-6% च्या मर्यादेच्या वर राहिले आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकात ३ महिन्यांचा घसणीचा…
इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. देशातील सर्वात मोठं गहू (Wheat) उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये गव्हाची चंटाई निर्माण झाली आहे. त्यामुळं तिथे गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) वाढ झाली आहे. तसेच बिहारमध्ये देखील गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलने उत्तर प्रदेश आणि बहारमध्ये गव्हाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यांना प्रथमच गव्हाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. …
देशातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करत असतात. अशातच तुम्हीही सणासुदीच्या दिवसांत सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात दहा ग्रॅममागे एक हजार रुपयांनी तर चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची घट झाली आहे. धनत्रयोदशी, दीपावलीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात धातूंच्या किमतीत पुन्हा घसरण झाली. पाच दिवसांपूर्वी म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात 1600 रुपयांनी तर चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ झाली होती, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याऐवजी चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आहे. सणांव्यतिरिक्त लग्नसराईची खरेदी जोरात…
गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक (Onion grower) शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला होता. खरिपातील कांदा बाजारात काही दिवसांत बाजारात येणार आहे मात्र शेतकऱ्यांनी साठवलेल्या उन्हाळी कांद्याला भाव मिळत नव्हता. तसेच साठवलेला कांदाही खराब होऊ लागला होता. मात्र आता कांद्याचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांना पूर्वीचे नुकसान भरून काढण्याची आशा आहे. येवला, नाशिक, कळवण, संगमनेर, कल्याण अशा अनेक मंडईंमध्ये कांद्याचे दर प्रतिकिलो सरासरी १५ रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यांची किंमत अद्याप निघू शकलेली नसली तरी एक-दोन-पाच रुपये किलोची परिस्थिती फारशी वाईट नाही. दिवाळीपूर्वी भावात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. कारण आता बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खराब होऊन निम्म्यावर…
गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला आहे. याचे चांगले फायदे दिसून आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून भारतातही उद्योग समूहांकडून दूध काढणी यंत्र निर्मिती केली जात आहे. याच्या किमतीत लहान शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आहेत. अगदी तीन जनावरांपासून ते १००० जनावरांच्या गोठ्यामध्ये दूध काढणी यंत्राच्या विविध प्रणाली वापरण्यात येत आहेत. या दूध काढणी यंत्रामध्ये झालेली गुंतवणूक एक – दीड वर्षात जादा नफ्यातून फेडता येते. दूध काढणी यंत्रणा १) सिंगल…
सांगली जिल्हातील घोरपडी(ता.कवठेमहांकाळ) येथे वीज अंगावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. बापू अर्जुन नरळे ( वय ३६) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घोरपडी येथील नरळे वस्तीवर घडली. याबाबतची मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी घोरपडीसह परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. दुर्दैवी बापू नरळे हे मोटारसायकलने शेतातून नरळेवस्तीवरील घराकडे निघाले होते. मोटारसायकलवर असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. बापू नरळे यांनी गतवर्षी ग्रामपंचायत निवडणुकीला सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. या दुर्दैवी घटनेमुळे घोरपडीसह परिसरात शोककळा पसरली आहे.
कोकण परिसरात खरिपाच्या हंगामातील अनेक शेतकऱ्यांचे भाताचे पीक कापणीला आले आहेत. मात्र, पाऊस पाठ सोडत नसल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दोन दिवस पुन्हा पाऊस पडल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. पाऊस थांबला नाही, तर हातातोंडाशी आलेला मोत्याचा घास वरुणराजा हिरावून नेतो की काय? ही चिंता बळीराजाला पडली आहे. सध्या वातावरणात उकाडा असून, आकाश ढगाळलेले असल्याने परतीच्या पावसाची अजूनही शक्यता आहे. यावर्षी पाऊस वेळेवर झाला असल्याने शेतकऱ्यांची खरिपाच्या हंगामातील भात लावणीची कामे वेळेवर झाली. पीकही चांगले आले आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक कापणीला आले आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले. आठ दिवसांपूर्वी झालेल्या वादळी, जोरदार पावसासह विजेच्या कडकडाटामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. परतीचा पाऊस सुरू…
