Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

August 12, 2026

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » दूध काढणी यंत्राची गरज आणि फायदे
ग्रामीण उद्योग

दूध काढणी यंत्राची गरज आणि फायदे

Neha SharmaBy Neha SharmaOctober 12, 2022Updated:October 12, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे कमीत कमी खर्चात दर्जेदार दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून नवनवीन प्रणालींचा वापर केला जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला आहे. याचे चांगले फायदे दिसून आले आहेत.

 

गेल्या काही वर्षांपासून भारतातही उद्योग समूहांकडून दूध काढणी यंत्र निर्मिती केली जात आहे. याच्या किमतीत लहान शेतकऱ्यांना परवडणाऱ्या आहेत. अगदी तीन जनावरांपासून ते १००० जनावरांच्या गोठ्यामध्ये दूध काढणी यंत्राच्या विविध प्रणाली वापरण्यात येत आहेत. या दूध काढणी यंत्रामध्ये झालेली गुंतवणूक एक – दीड वर्षात जादा नफ्यातून फेडता येते.
दूध काढणी यंत्रणा
१) सिंगल बकेट व डबल बकेट दूध यंत्रणा –
यंत्राची जोडणी करून आपण एका तासात सिंगल बकेट (एक कॅन बकेट) यंत्राद्वारे १० ते १२ गाई / म्हशींचे दूध काढू शकतो. तसेच डबल बकेट (दोन कॅन / बकेट) यंत्राद्वारे १२ ते २४ जनावरांची धार काढू शकतो.
२) फोर बकेट / सिक्‍स बकेट दूध यंत्र –
फोर बकेट (चार कॅन / बकेट) यंत्राने तासाला ४० ते ५० जनावरांचे दूध काढू शकतो. सिक्‍स बकेटद्वारे (सहा कॅन / बकेट) तासाला ६० ते ७५ जनावरांची वरीलप्रमाणे पाइप फिटिंग गोठ्यामध्ये बसवून दूध जनावरांच्या जवळ जाऊन काढता येते.
३) मिल्किंग पार्लर (सेमी ऑटोमॅटिक/ऑटोमॅटिक) –
मिल्किंग पार्लरमुळे गोठ्यातील पाइपलाइनचा खर्च वाचू शकतो. जनावरांचा फेरफटका झाल्याने त्यांचा व्यायाम होतो. गोठ्यातून थोड्या अंतरावर दूध काढणी केल्याने “स्तनदाह’सारखे वारंवार होणारे आजार टाळता येतील. मोठ्या गोठ्यामध्ये केव्हाही स्वयंचलित दूध काढणी यंत्रणा (ऑटोमॅटिक मिल्किंग) पार्लरमध्ये बसवण्यापेक्षा प्रथम टप्प्याटप्प्यांनी नियोजन करावे. उदा. प्रथम फोर बकेट, सिक्‍स बकेट दूध काढणी यंत्रणा बसवून त्या प्रणालीची पूर्ण माहिती झाल्यानंतरच अर्ध स्वयंचलित प्रणाली बसवावी. कारण दूध काढणी यंत्र आणि एकूण प्रणालीमध्ये कोणताही अदलाबदल न करता आपण अर्ध स्वयंचलित प्रणालीकडे वळू शकतो.

अर्ध स्वयंचलित दूध काढणी यंत्राचे फायदे

१) थोडी यंत्रणा व थोड्या मानवी साह्याने ही दूध काढणी प्रणाली वापरण्यास सुलभ आहे.
२) स्वयंचलित यंत्रणेमध्येही मजुरांची संख्या तेवढीच असते जेवढी अर्ध स्वयंचलित प्रणालीमध्ये असते. (सडांना शेल लावण्यासाठी)
३) स्वयंचलित यंत्रणेमध्ये बिघाड आल्यास संपूर्ण दूध काढणी व्यवस्था खोळंबू शकते. पण अर्ध स्वयंचलित यंत्रणेमध्ये अशी शक्‍यता जवळपास नसते.
४) स्वयंचलित यंत्रणेमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक व्यक्तीची गरज असते.
५) थोडक्‍यात, स्वयंचलित यंत्रणेमध्ये पुन्हा आपण कोणावर तरी अवलंबून राहण्यापेक्षा, सोपी सुटसुटीत अर्ध स्वयंचलित प्रणाली फायदेशीर होऊ शकेल.

दूध काढणी यंत्राची गरज आणि फायदे

१) अवलंबन – छोट्या गोठ्यामध्ये (दोन-तीन जनावरे) असतील आणि पशुपालक हाताने दूध काढत असतील, तर जनावरांच्या धारा काढणाऱ्या व्यक्तीस स्वत- थांबावे लागते. मध्यम, मोठ्या गोठ्यामध्ये मजुरांवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते. शेतकऱ्याला मजुरांच्या सोईने वागावे लागते; परंतु दूध काढणी यंत्र दहा वर्षांच्या मुलापासून घरातील कोणीही व्यक्ती सहज वापर करू शकत असल्याने मजुरांवरील अवलंबन कमी होते.
२) वेळ आणि पैशाची बचत – साधारण गोठ्यामध्ये पाच ते दहा जनावरे असतील तर हाताने दूध काढण्यास लागणाऱ्या वेळेपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी कालावधीत आपण दूध यंत्राच्या साह्याने दूध काढू शकतो. तसेच मजुरांची असणारी संख्या आपण एकतृतीयांश कमी करून (सरासरी २४,०००/- वार्षिक प्रति मजुरी) आपण पैशाची बचत करून नफ्याचे प्रमाण वाढवू शकतो.
३) दुधाचा दर्जा व प्रमाण – हाताने दूध काढण्याच्या पद्धतीत दुधातील जंतूंचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे भारतातील दुधाची प्रत इतर देशांच्या मानाने कमी आहे. जर प्रत कमी असेल तर साहजिकच दरही कमी होतो. दूध काढणी यंत्राचा वापर केल्याने मानवी हाताचा दुधाला स्पर्श टाळून दुधातील जंतूंचे प्रमाण सर्वांत कमी करून दर्जा वाढवून नफा कमवू शकतो. हाताने दूध काढताना व्यक्ती पहिल्या जनावराकडून शेवटच्या जनावराकडे जाईपर्यंत दूध काढताना कंटाळू शकतो.
बऱ्याच वेळेस १० ते १५ टक्के दूध सडातच राहू शकते. पण दूध काढणी यंत्र अखंडपणे काम करू शकते. प्रत्येक जनावर सहा ते सात मिनिटांतच जास्त प्रमाणात दूध देते, कारण हीच त्यांची “पान्हा वेळ’ असते. त्याच काळात कितीही दूध देणारे जनावर असले तरी दूध यंत्र सहा ते आठ मिनिटांत दूध काढते. एकंदरीत हाताने काढण्यापेक्षा दूध काढणी यंत्राद्वारे १० ते १५ टक्के दूध वाढू शकते.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

विदेश की जॉब छोड़कर कर रहे ‘इस’ फल की खेती, कमा रहा है लाखो रुपए 

September 20, 2023

मनरेगा योजना म्हणजे काय?

June 29, 2023

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून कशी काळजी घ्यावी

June 27, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

N1 Bet Casino – Quick‑Hit Slots, Live Action, and Instant Wins for Fast‑Paced Players

ताज्या बातम्या August 12, 2026

For the adrenaline‑driven gambler who prefers short bursts of excitement over marathon sessions, N1 Bet…

Wolf Winner: Quick‑Hit Slots and Lightning‑Fast Wins

August 12, 2026

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.