- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नाशिक जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव बाजार समितीमध्ये आता लाल कांद्यांची आवक सुरू झाली आहे. नाशिक : नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याच्या खराब होण्याच्या प्रकरणाची आता हस्तक्षेप चौकशी करून या प्रकरणाचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हा प्रशासन सादर करणार आहे. याबाबतचा अहवाल हा पोर्टलवर देखील जाहीर करण्याचे आदेश मंगळवारी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. केंद्र सरकारने बाजार हस्तक्षेप योजनेमध्ये दखल देत कांद्याचे भाव हे गगनाला भिडत असताना सर्वसाधारण मी जून महिन्यात करून नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सर्वसाधारण काही लाख टन कांदा हा नाफेडने अतिशय कवडीमोल भावात सर्वसाधारण ९ ते…
पुणे : राज्यात सध्या सत्तासंघर्ष आहे. शिवसेना धनुष्यबाणावरून राजकारण तापले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी महाराष्ट्रात राज्य सरकार अस्तित्वात आहे का ? असा प्रश्न विचारून शिंदे सरकारला जाब विचारला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना राज्याचे मुख्यमंत्री बंडखोरांच्या मतदारसंघात दौरे करण्यात व्यस्त होते, असेही ते म्हणाले. “महाराष्ट्रात बेकायदेशीर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले. नव्याचे नऊ दिवस आता संपतील, मग संपतील, सरकारी कामे गतीने सुरू होतील, या सर्वांची सामान्य जनता वाट पाहात होती. अशातच राज्यात अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे शेतकरी अडचणीत आला. अतिवृष्टीमुळे सुमारे २२…
पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच नुकसान वाशिम जिल्ह्यात पहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबिन पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर कापून ठेवलेल्या सोयाबिनला कोंब फुटले आहेत. दरम्यान सोलापुरमध्येही ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने बार्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच सोयबिन वाहुन गेलं आहे. तर पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. पुण्यातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पुणे- नाशिक मार्गावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. तर शेतमालाचेही अतोनात नुकसान झालं…
नवी दिल्ली – देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी (11 ऑक्टोबर) इथेनॉलवर चालणारी पहिली कार देशात लॉन्च केली आहे. यावेळी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादवही उपस्थित होते. या कार लॉन्चिंगकडे महागड्या पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून पाहिले जात आहे. खरे तर, देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामुळे लोकांच्या खिशावरही मोठा ताण पडत आहे. यामुळेच, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. इथेनॉलवर चालणारी कार केवळ परवडणारी आणि स्वस्तच नसेल, तर तिच्या सहाय्याने पर्यावरणावर वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या वाईट परिणामांपासूनही संरक्षण होईल. ऊसापासून इथेनॉलची निर्मिती केली जाते. उसाच्या उत्पादनात भारताचा जगात…
सांगली : ब्राझीलमध्ये उसाला ९ ते १६ हजार रुपये असा उच्चांकी प्रतिटन भाव दिला जातो. तसेच पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात ४ हजार तर इजिप्तमध्ये ३६००, थायलंड, मलेशियात ३२०० असा विक्रमी दर दिला जातो, अशी माहिती साखर कारखानदारातील तज्ज्ञ व शेती प्रश्नांचे अभ्यासक बाळासाहेब कुलकर्णी यांनी दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले आहे की, ब्राझीलमध्ये ऊस शेती व साखर उद्योगाला औद्योगिक स्वरूप दिले आहे. तेथे एकरी १५० ते २०० टन उत्पादन घेतले जाते. सरासरी रिकव्हरी १६ ते १८ टक्के असते. उसाची तब्बल पाच पिके तेथील शेतकरी घेतात. बहुतांश शेती ही कारखानदार कंत्राटी व यांत्रिकीकरण पध्दतीने करतात. दररोज ५० ते ६० हजार…
पुणे जिल्ह्यातील एका हौशी शेतकऱ्याने आपल्या लाडक्या गाईचं डोहाळे जेवण ठेवलं होतं. या शेतकरी कुटुंबाने गाई प्रती अशा प्रकारे संवेदना दाखवल्याने पुणे जिल्ह्यात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथे हा आगळावेगळा समारंभ पार पडला. हौसा नावाच्या खिल्लार गाईचे डोहाळे जेवण आणि ओटी भरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. इतकच नाही तर या शेतकऱ्याने सुंदर पैठणी या गाईला नेसवत गावातून तिची मिरवणूक ही काढली. याविषयी माहिती अशी, की मुलाच्या लग्न सोहळ्यात धंगेकर कुटुंबीयांना जातिवंत खिल्लार गाईचे वासरू भेट म्हणून आले होते. धंगेकर कुटुंबीयांनी या गाईच्या वासराचा घरातल्या व्यक्तीप्रमाणे सांभाळ केला. तिचं नाव हौसा ठेवलं. इतकच नाही तर…
ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर व त्वचेसाठी गुणकारी असून राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादन घेत आहेत. अमेरिकतील वाळवंटातील या फळाची आता देशासह राज्यातील अनेक भागात शेती केली जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी जवळपास गेल्या १० ते १५ वर्षांपासून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. महाराष्ट्र सरकारनं ड्रगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून ड्रॅगन फ्रुट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी हेक्टरी १ लाख ६० हजारांचं अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीसाठी अनुदान मिळवायचं असल्यास शेतकऱ्यांना महाडीबीटी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज दाखल करणं आवश्यक आहे. किती…
सांगली : थकित एफआरपी रक्कम, १५ टक्के व्याजासकट दिली पाहिजे, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कारखान्यांनी तो पाळावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. आगामी हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. इस्लामपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘केंद्र शासनाने निर्यात साखरेला चांगला भाव दिला आहे. कारखान्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे २०० रुपये वाढवून द्यावेत. कारखाने बिगर सभासदांकडून घेत असलेले पैसे बेकायदेशीर आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या ठेवींची मागणी करावी,’’
कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगलीमधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चारही आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हत्तीचे हस्तीदंत तस्करी करणारी टोळी गजाआड केली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत पोलिसांनी जप्त घेतले आहेत. यामध्ये चार जणांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली. चार जण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा…
मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज(दि.11) तारखेपासून परतीचा पाऊस असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. परंतु मागच्या काल पासून सुरू झालेल्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात मुंबईसह उपनगरात काल(दि.10) पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. परंतु मुंबई परिसरात पाऊस झाला नाही परंतु कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. दरम्यान आज पहाटे पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान काल मुंबई परिसरात पाऊस झाला नसला तरी वातावरणात दमटपणा होता. यामुळे मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी आणि बुधवारीही मुंबईमध्ये यलो…
