- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.…
पुणे ः मॉन्सून (Monsoon) दाखल होऊन तब्बल साडेतीन महिने झाले आहेत. सुरूवातीच्या काळात कमी पाऊस (Rainfall) झाला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत मुसळधार झालेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत (Dam Overflow Due To Heavy Rain) आहेत. धरणांमध्ये आतापर्यंत तब्बल तब्बल १२६८.४५ टीएमसी म्हणजेच सरासरी ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भेडसावणारा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.राज्यात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची तब्बल ३ हजार २६७ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता सुमारे १४३९.६९ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत सरासरी ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सात टक्क्यांनी अधिक…
उसाच्या नवनवीन बियाण्यांच्या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काही उत्पादने आहेत, ती शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत असल्यामुळे शेतकरी देखील या व्हीएसआयच्या अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपयुक्त उत्पादन ते घेतात.याच पार्श्वभूमीवर व्हीएसआय कडून नवीन ऊसाच्या जाती चा शोध लावण्यात आला असूनजवळ जवळ मागच्या सात वर्षापासून साखर कारखान्यांच्या चर्चेत ही जात आहे. ती जात म्हणजे ‘को व्हीएसआय 18121’ही होय. या जातीच्या चाचणी आता अंतिम टप्प्यात आले असून लागवडीसाठी 2024 पर्यंत व्हीएसआयकडून या जातीची शिफारस करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे माहिती देण्यात आली.जर…
▶️राज्यात फोर्टिफाईड तांदळाचे दोन टप्प्यात वितरण करण्यात येणार ▶️पोलीस शिपाई संवर्गातील २०२१ मधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट. एकूण २० हजार पदे भरण्यात येणार ▶️राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचे पुनर्गठन होणार ▶️नगर विकास विभागाच्या प्रशासकीय कामकाजासाठी व राज्य शहर नियोजन संस्थेकरिता पायाभूत सोयी सुविधा निर्माण करणारी योजना सुरू करणार ▶️इतर मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतीगृहे सुरु करण्यात येणार ▶️इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आता ५० विद्यार्थ्यांना मिळणार ▶️उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबविणार. शिष्यवृत्तीची रक्कम ५० हजारापर्यंत वाढविली. ▶️महाराष्ट्र…
माणसाच्या ५० टक्के आजाराला त्याचे पोट कारणीभूत असते. पोट नीट असलं की स्वास्थ्य आलबेल राहू शकते. त्यासाठी एक साधी भाजी महत्त्वपूर्ण कार्य करते ती म्हणजे शेंगेसारखी दिसणारी भेंडी ही भाजी होय. भेंडीच्या आत चविष्ट बिया असतात पण जाडसर, पारदर्शक द्रव असतो. काहींना ती आवडत नाही. पण तुमच्या पोटाचे विकार विशेषतः बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीच्या त्रासांवर भेंडी अक्सर इलाज असल्याचे आढळले आहे. या भाजीचा नियमित खुराक पचनेंद्रियांच्या कार्यासाठी लाभदायक ठरतो. इलिनोईस युनिव्हर्सिटीतील एक संशोधक डॉ. सिल्विया झूक यांच्या नोंदणीनुसार भेंडीची भाजी ही विविध अन्नद्रव्यांचे पॉवर हाऊस आहे. त्यातील अर्धा हिस्सा गम आणि पेक्टिनच्या धाग्याच्या रुपात असतो. त्यातील विद्राव्य तंतूमय अन्नामुळे रक्तातला कोलेस्टरॉल…
“फार्मर्स टू फार्मर्स अॅग्रीकल्चर नॉलेज एक्सटेंशन” म्हणजे काय? “फामर्स टू फार्मस नॉलेज एक्सटेंशन”चा मराठीतील अर्थ आहे शेतकरी ते शेतकरी ज्ञान प्रसार. कृषी ज्ञान प्रसाराचे तीन मार्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञ ते शेतकरीकृषी विभाग विस्तार यंत्रणा ते शेतकरीआणिशेतकरी ते शेतकरी यातील तिसरा पर्याय कृषी ज्ञान विस्तारामध्ये सर्वांत प्रभावी मानला जातो. शेतकऱ्याची भाषा शेतकऱ्याला चांगली कळते. एक प्रशिक्षित, हुशार शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला आपल्याकडचे पीकपाण्याचे ज्ञान, कौशल्य हस्तांतरीत करतो. यालाच शेतकरी ते शेतकरी ज्ञानप्रसार म्हटले जाते. शेती तंत्रज्ञान विस्तारातील प्रभावी उपकरण. एक उदाहरण.शेतकरी ते शेतकरी ज्ञान प्रसार चळवळीतील अग्रणी संदीपनाना कोकाटे (येवला) यांनी एक उदाहरण दिले.ते म्हणाले, “मी प्रगतीशील युवा शेतकरी अमोल भोसेकर (नेवासा) यांच्याकडून…
सोलापूर : बागायती व जिरायती जमिनीच्या खरेदी-विक्रीवरील क्षेत्राचे निर्बंध आता उठणार आहेत. तुकडेबंदी-तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा- १९४७ मध्ये बदल करून जिरायती जमीन खरेदी-विक्रीसाठी किमान २० गुंठे आणि बागायतीसाठी पाच गुंठ्याची मर्यादा असणार आहे. तसा प्रस्ताव महसूल विभागाने सरकारला सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जमीन खरेदी-विक्रीवेळी तंटे किंवा वादविवाद होऊ नयेत म्हणून जिरायत व बागायत जमिनीसाठी राज्य सरकारने नवे नियम लागू केले. जिरायत जमीन दोन एकरापेक्षा (८० गुंठे) कमी असल्यास खरेदी-विक्रीआधीच जिल्हाधिकारी किंवा प्रातांधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली. एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असल्यास त्याची मर्यादा २० गुंठे केली. दोन एकराच्या गटातील पाच-सहा गुंठे जमीन खरेदी-विक्री करताच येणार नाही, असाही नियम…
युरोपातील काही प्रमुख देशात ऊर्जा संकट गंभीर होत आहे ; भविष्यात अजून होईल ! युरोपातील जर्मनीसारखे देश नैसर्गिक वायू / तेलासाठी रशियावर अवलंबून राहिले आहेत ; आणि रशिया युक्रेन संघर्षानंतर रशियाचा ऊर्जेचा स्रोत क्षीण होत आहे या देशात ऊर्जा क्षेत्र मोठ्याप्रमाणावर खाजगी मालकीचे आहे जर्मनीतील ऊर्जा कंपन्यांना जागतिक बाजारात महागात इंधन विकत घ्यावे लागल्यामुळे त्यांचे अर्थकारण बिघडत चालले आहे ; इतके कि त्या दिवाळखोरी जाहीर करू शकतात देशाला ऊर्जा तर पाहिजे ; नाहीतर अख्खा देश ठप्प होईल ; पण ऊर्जा क्षेत्र पूर्णपणे खाजगी क्षेत्रात; आणि खाजगी ऊर्जा कंपन्या दिवाळखोरीत ; मग उपाय काय ? उपाय तोच ; अनेक शतके जुना…
भगर -हे एक भरडधान्य आहे. 4000 वर्षांपूर्वी जपानमध्ये जन्म झालेल्या या भरडधान्याला आणि भारतात सामान्यपणे पिकणाऱ्या त्याच्या उपजातींना भगर म्हणतात. त्याचे दाणे हे फिकट राखाडी रंगाचे व आकाराने लहान असतात. भरडधान्यांच्या तांदळांपैकी भगर हा एक तांदूळ आहे. भारताच्या बऱ्याच भागात नवराञीदरम्यान हे एक आवडते उपवासाचे अन्न म्हणून खाल्ले जाते म्हणूनच त्याला “उपवासाचा तांदूळ” देखील म्हटले जाते. हा एक चवदार तांदूळ आहे. ह्यावर प्रक्रिया करून हा खाण्यायोग्य केला जातो. अनेक ठिकाणी तांदळाला पाॅलिश करून तो पूर्णपणे पांढरा केला जातो त्यामुळे त्यामधील पोषकतत्वे नष्ट होतात म्हणून सर्वसाधारणपणे फिकट राखाडी रंगाची भगर (पाॅलिश न केलेली) खाण्यात असावी. आरोग्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे उर्जास्रोत…
… पण मला एक सांगा कि तुम्ही खरोखर कोण आहात ? कृषी सेवा केंद्रावरील भयानक वास्तविकता : शेतकऱ्यांनी कृषी साक्षर होण्याची गरज ..शुक्रवार २३.०९.२०२२ ठिकाण : अहमदनगर मार्केट यार्ड परिसर नगरमध्ये ब्रँडेड कंपन्यांचे डीलर असणाऱ्या नामांकित कृषी सेवा केंद्रामध्ये कांदा पिकासाठी ब्रँडेड कंपन्यांचे चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये खरेदी साठी गेलो असता दुकानातील विक्रेता आणि मुनीमजी सोबत शेतकऱ्याची झालेली मुक्त चर्चा … कामगार : बोला काय हवं आहे ?शेतकरी : …. (ब्रँडेड) अमुक कंपनीचे सूक्ष्म अन्नद्रव्ये आपल्याकडे उपलब्ध आहे का ?कामगार : हो गोडाऊनला आहे, किती हवे आहे ?शेतकरी : एक किलो हवे आहे आणि किंमत किती आहे ?कामगार : पाहून सांगतो…
