उसाच्या नवनवीन बियाण्यांच्या संदर्भात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये कायमच वेगवेगळे प्रयोग घेतले जातात. या प्रयोगांचा फायदा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्यातच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची काही उत्पादने आहेत, ती शेतकऱ्यांना खूप फायद्याची ठरत असल्यामुळे शेतकरी देखील या व्हीएसआयच्या अर्थात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उपयुक्त उत्पादन ते घेतात.
याच पार्श्वभूमीवर व्हीएसआय कडून नवीन ऊसाच्या जाती चा शोध लावण्यात आला असूनजवळ जवळ मागच्या सात वर्षापासून साखर कारखान्यांच्या चर्चेत ही जात आहे.
ती जात म्हणजे ‘को व्हीएसआय 18121’ही होय. या जातीच्या चाचणी आता अंतिम टप्प्यात आले असून लागवडीसाठी 2024 पर्यंत व्हीएसआयकडून या जातीची शिफारस करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याचे माहिती देण्यात आली.
जर आपण को 86032 या उसाच्या जातीचा विचार केला तर या जातीच्या तुलनेत को व्हीएसआय 18121 ही जात सरस ठरत आहे. या वानावर गेल्या काही वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद संयुक्तपणे संशोधन करीत आहेत.
को व्हीएसआय 18121 ही जात को-86032 व को 8201 या दोन वाणाच्या संकराच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे.
आतापर्यंत या वाणांच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरु आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने 2018 मध्ये पाण्याचा ताण सहन करू शकणारी 08005 ऊसाची नवीन जात प्रसारित केली होती
त्यामुळे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात अर्थात जिथे पाण्याची कमी असते अशा भागात देखील उसाची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली.
को व्हीएसआय 18121 या वाणाच्या चाचणी अजून काही महिने चालतील असे सांगितले जात असून 2024 ते 25 पर्यंत या वाणाच्या गाळप चाचण्या होतील व त्या माध्यमातून निष्कर्ष पाहून सार्वत्रिक लागवडीसाठी शिफारस केली जाईल अशी माहिती, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सूत्रांनी ॲग्रोवन ला दिली.
Source: agrowon
साभार-vsi
फोटो-vsi