- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नमस्कार गडकरी साहेब, आपण नुकतेच बोलला होतात कि अमिरिकेत सोयाबीनचा एकरी ३० क्विंटलचा उतार असून त्यामानाने आपल्या देशात सोयाबीन चे उत्पादन १० ते १४ क्विंटल पर्यंत आहे. आपल्या विधानाने संपूर्ण देशासहित मीडिया चे लक्ष या निमित्ताने का होयना शेतकर्त्यांकडे गेले आहे. त्या निम्मीतनाने मी काहि गोष्टी आपल्या समोर आणू पाहत आहे तुम्ही यात नक्की लक्ष घालाल हि अपेक्षा करतो , अमेरिकेत GM पिकांना परवानगी देण्यात आली आहे भारतात मात्र सरकार कडून बाद झालेले हायब्रीड बियाण लागवड करण्याची सक्ती करण्यात येते जगात आपल्या पेक्षा प्रगत तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते आपल्या देशात शेतकऱ्यांवर अनेक प्रकारची बंधने लादली जातात भारतीय शेतकरी जगा…
महिन्याच्या सुरुवातीपासून सक्रिय झालेल्या मोसमी पावसाचा तडाखा राज्यातील शेतीला बसला आहे. सुमारे दोन लाख ३३ हजार ८९७ हेक्टरवरील खरीप हंगामातील पेरण्यांसह, नगदी पिके आणि फळबागांचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शहरांकडे जाणारे महामार्ग कोंडल्यामुळे भाजी-पाल्याच्या पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांच्या घाऊक दरांत वाढ झाली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या दोन-तीन दिवसांत मुंबई-ठाण्यात किरकोळ बाजारात भाज्यांचे दर आणखी वाढण्याची भीती आहे. संततधारेने भाजीपाल्याची आवक नाशिकमध्ये निम्म्याने कमी झाली असताना उपलब्ध होणारा माल खड्डेमय महामार्गावरील वाहतूक कोंडीतून मुंबईत वेळेत पोहोचविणे जिकीरीचे ठरत आहे. याचा विपरित परिणाम दरवाढीसह मुंबईच्या दैनंदिन भाजीपाला पुरवठय़ावर झाल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातूून नाशिक कृषी उत्पन्न बाजार…
हिंगोली जिल्ह्यातील एसबीआय बँक आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत आसना नदीचे पाणी गेल्याने बॅंकेतील 12 लाख 22 हजार रूपयांची रोकड भिजली आहे. शिवाय बँकेतील फाईल देखील भिजल्या असून संगणकांचे नुकसान झाले आहे. 9 जुलैपासून हिंगोलीत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन देखील झालेलं नाही. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका बसला आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हिंगोली मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्या-नाले तुडूंब भरून…
मिर्ची लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी मिळवलेल्या अनेक बियाण्यांवर रोगांची मालिका टाळण्यासाठी यापूर्वी उपचार केले गेले आहेत. असे नसल्यास, अनेक भाजीपाला पिकांच्या बियाण्यांवर रोग आणि कीटकांपासून संरक्षण करण्यासाठी खालील रासायनिक उत्पादनांसह प्रक्रिया किंवा “लेपित” केले जाऊ शकते. येथे काही शिफारसी आहेत: • बुरशीजन्य रोगांविरुद्ध: थायरम, कॅप्टन किंवा मॅन्कोझेब असलेले द्रावण (2.5 ग्रॅम/किलो बियाणे) लागू केले जाऊ शकते आणि 3 आठवड्यांपर्यंत संरक्षण देते. शोषक किडींपासून: इमिडाक्लोप्रिड 600 एफएस (5 मिली/किलो बियाणे) किंवा थायोमेथॉक्सम 70 डब्ल्यूएस (5 ग्रॅम/किलो बियाणे) पेरणीनंतर 20 दिवसांपर्यंत बियांचे संरक्षण करेल. सर्व प्रकरणांमध्ये, उपचारानंतर, बिया सुमारे 30 मिनिटे ते एक तासासाठी सावलीत सुकविण्यासाठी सोडल्या पाहिजेत. • तुमच्या विस्तार अधिकारी किंवा स्थानिक…
GST : जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी (GST) लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. पॅकिंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्य, डाळी आदी पदार्थांवर 18 जुलैपासून जीएसटी लागू करण्यात येणार आहे. व्यापारी संघटनांनी त्याचा निषेध केलाय. त्यासाठी आज एक दिवसाचा देशव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. जीएसटी लागू होताच अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. धान्य आणि डाळी 8 ते 10 टक्क्यांनी वाढतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. या वस्तूंवर जीएसटी भरावा लागेल : डब्यात किंवा पॅक केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ…
मौजूदा खरीफ सीजन में कपास की बुआई पहले ही 10 मिलियन हेक्टेयर को पार कर चुकी है, घरेलू बाजार में कीमतों में और गिरावट आने की संभावना है। कॉटन एसोसिएशन ऑफ इंडिया के अध्यक्ष अतुल गनात्रा ने कहा, वर्तमान में कपास की कीमतें 80,000-85,000 रुपये प्रति कैंडी (1 कैंडी = 356 किलोग्राम) के आसपास मँडरा रही हैं। कीमतों में और सुधार। इस साल की शुरुआत में एक समय में कपास की कीमत 110,000 रुपये प्रति कैंडी तक जाती थी। महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना और तमिलनाडु में अगस्त के दूसरे सप्ताह तक बुवाई जारी…
कपड़ा सलाहकार समूह के साथ गुरुवार को मुंबई में एक संवाद बैठक को संबोधित करते हुए, कपड़ा मंत्री ने कहा कि कपास की उत्पादकता में सुधार के लिए अच्छी गुणवत्ता वाले बीजों की आपूर्ति महत्वपूर्ण आवश्यकता है। केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने कपास की उत्पादकता बढ़ाने के लिए “उन्नत प्रौद्योगिकियों और नवीन कृषि विज्ञान” को पेश करने की आवश्यकता पर जोर दिया। कपड़ा सलाहकार समूह के साथ गुरुवार को मुंबई में एक संवाद बैठक को संबोधित करते हुए, कपड़ा मंत्री ने कहा कि कपास की उत्पादकता में सुधार के लिए अच्छी गुणवत्ता वाले बीजों की आपूर्ति महत्वपूर्ण आवश्यकता है। उन्होंने…
पुणे – पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा आता ७८.३१ टीएमसी इतका झाला आहे. हाच पाणीसाठा १४ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जून २२ रोजी अवघा १६.८९ टीएमसी इतका अल्प झाला होता. दरम्यान, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यामध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे. यापैकी गेल्या वर्षभरात २००.९७ टीएमसी…
राज्य शासनाने नियमित पीक कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 मध्ये प्रत्येकी 50 हजार रूपये अनुदानाची घोषणा केली. याबाबत अजूनही प्रशासकीय पातळीवर सचिव व अधिकारी यांच्यामध्ये संभ्रमावस्था असून आर्थिक वर्षाच्या निकषामध्ये पुन्हा नियमीत कर्जफेड करणारा शेतकरी वंचित राहणार असल्याने याबाबत पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची यादी ग्राह्य धरून शासन निर्णय करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. ऊस , केळी व द्राक्षे यासारखे बहुवार्षिक पिकांची पिक कर्जे १ वर्षापेक्षा जास्त कालावधीची असतात असे कर्जदार सलग तीन आर्थिक वर्षाच्या कर्ज परत फेडीच्या निकषात बसत नाहीत. तेव्हा वर्षानुवर्षे प्रचलित असलेली डॅा.…
२०२०-२१ मध्ये देशातून ३ कोटी ६ लाख टन मालाची निर्यात होऊन १ लाख ५० हजार ९४६ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. २०२१-२२ मध्ये ४ कोटी ९ लाख ४३९६० टन मालाची निर्यात झाली असून तब्बल १ लाख ८३ हजार २२९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. देशातून कृषिमालाची निर्यात वाढू लागली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये तब्बल १९४ देशांमध्ये विविध वस्तूंची निर्यात केली आहे. सर्वाधिक निर्यात बांगलादेशात होत असून तीन वर्षांत त्यामध्ये १३ पट वाढ झाली आहे. यूएईचा दुसरा क्रमांक असून सर्वच आखाती देशांमधून भारतीय शेतमालाच्या मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळावा व कृषी व्यापारातून विदेशी मुद्रा प्राप्त…
