Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पुणे जिल्ह्यातील धरणसाठा १४ दिवसांत १७ टीएमसी वरून ७९ टीएमसी वर
ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यातील धरणसाठा १४ दिवसांत १७ टीएमसी वरून ७९ टीएमसी वर

Neha SharmaBy Neha SharmaJuly 16, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे – पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा आता ७८.३१ टीएमसी इतका झाला आहे. हाच पाणीसाठा १४ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जून २२ रोजी अवघा १६.८९ टीएमसी इतका अल्प झाला होता. दरम्यान, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यामध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे. यापैकी गेल्या वर्षभरात २००.९७ टीएमसी पाणी वापरले गेले होते, असेही या अहवालातून स्पष्ट झाले होते.

गेल्या वर्षीच्या याच तारखेपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा ३८.७० टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत सर्व धरणांत मिळून एकूण ३९.६१ इतका पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, खडकवासला, कलमोडी, आंद्रा ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. जूनच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती. शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता, असे जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून उघडकीस आले आहे.

खडकवासला, ता. १४ : खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा ५० टक्के झाला आहे. दरम्यान, पानशेत व वरसगाव ही धरणेही पन्नास टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून बुधवारी रात्री १३ हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. ते गुरुवारी सकाळी सहा वाजता चार हजार ७०८ क्युसेकपर्यंत कमी केले. मात्र, दिवसभर हा विसर्ग सुरू होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपेक्षा आज पावसाचा जोर निम्म्याने कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने धरणातील पातळीतदेखील तेवढ्याच प्रमाणात येवा (आवक) कमी झाली. चारही धरणांत मिळून १४.६८ टीएमसी म्हणजे ५०.३५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

प्रमुख धरणांतील शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

माणिकडोह – ३.९९

येडगाव – १.६३

वडज – ०.६८

डिंभे – ४.३०

चासकमान – ५.१८

भामा आसखेड – ५.०८

आंद्रा – २.९२

पवना – ४.३४

वरसगाव – ५.८२

पानशेत – ५.१३

खडकवासला – १.९४

गुंजवणी – २.२४

भाटघर – ९.७६

वीर – ७.५२

सौर्स : सकाळ

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

ताज्या बातम्या June 26, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino ▶️ ИГРАТЬ Содержимое Преимущества игры в…

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.