- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
जमिनीसंबंधीचे रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट नमुन्यात ठेवल्याखेरीज सर्वांना समजणार नाहीत व त्यातील बदल कळणार नाहीत. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गावातील महसूली माहिती ही गाव नमुना क्र.1 ते 21 या नमुन्यांमध्ये ठेवली जाते. त्यातील 7 नंबरचा नमुना मालकी हक्काबाबतचा आहे तर 12 नंबरचा नमुना पिकासंबंधीचा आहे. या दोन्हींचा मिळून 7/12 चा नमुना प्रस्तावित करण्यात आला. 7/12 उतारा हा जोपर्यंत बेकायदेशीर ठरविला जात नाही, तोपर्यंत तो कायदेशीर आहे असेच मानले जाते. त्यामुळे तो मालकी हक्कासंदर्भात प्राथमिक पुरावा म्हणून मानतात. परंतु 7/12 हा जमीन मालकीचा निर्णायक पुरावा मानता येत नाही. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याने त्यांच्या मालकीची 1 हेक्टर जमीन 5 मे 2000…
भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी 1/3 उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. सन 2010 -11 मध्ये राज्यात 10.22 लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड करण्यात आली. सन 2011-12 मध्ये हे क्षेत्र 10.43 लाख हेक्टर इतके वाढले, रज्यातील वाढलेले ऊसाचे क्षेत्राच्या प्रमाणात ऊसाची तोडणी आणि वाहतूक यासाठी लागणा-या वाढील यंत्रणेची आवश्यकता वाढली. मागील काही वर्षांमध्ये साखर उद्योगाला ऊस तोडणी आणि वाहतुकीच्या कामी मजुरांचा तुटवडा भासत आहे. राज्य शासनातर्फे दिल्या जाणा-या शैक्षणिक सुविधा, मजुरांसाठी रोजगाराचे वेगळे पर्याय, सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा सुधारल्यामुळे राहणीमानात झालेला बदल यामुळे राज्यात दिवसेंदिवस मजुरांची संख्या घटते आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना मजुरांचातुटवडा भासत आहे. मजुरांचा तुटवडा ही समस्या सोडवण्यासाठी, ऊसाची तोडणी करण्यासाठी…
नेहमीप्रमाणे आता पावसाळा आपल्या सर्वांच्या दारात येऊन उभा आहे…. नेमिचि येतो पावसाळा… मग वेगळं ते काय? असा प्रश्न पडणं नक्कीच स्वाभाविक आहे. पण यावर्षीचा पावसाळा नक्कीच वेगळा आहे. कारण यावर्षी प्रत्येक गाव माथ्यापासून पायथ्यापर्यंत गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब नि थेंब अडवणार आणि मातीत जिरवणार आहे. वाढत्या जागतिक तापमानावर सर्वत्र चर्चा होत असताना ग्रामविकास विभागाने इको व्हिलेजच्या माध्यमातून गावविकासाचे पर्यावरण स्नेही पाऊल टाकले… आता सातत्याने जाणवणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागाने त्यापुढचे पाऊल टाकत “पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानांतर्गत जलसमृद्ध गावांची पायाभरणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळात अभियानाची अंमलबजावणी होईल.…
यंदाचा मान्सून हा चांगला असेल असे सद्य अंदाज सांगतो. मे अखेर पर्यंत चित्र अजून चांगल्याप्रकारे स्पष्ट होईल. सरासरी एवढा, मुबलक पाऊस म्हणजे शेतीला ठीकठाक पाणी असेल म्हणायला हरकत नाही. सध्या मॉन्सून देखील बदलत आहे, एकाच दिवशी जास्तीचा पाऊस, वाढते बिगर पावसाचे दिवस आणि घटते पावसाचे दिवस. यामुळे शेतकऱ्यांची पीक पाणी नियोजन करताना धांदल उडते. इथपर्यंत सगळ ठीकठाक वाटते. इथे ना सरकार नाही विद्यापीठांचा दूरवर संबंध जाणवतो. पण चित्र तसे नाहीये. शेतीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक प्रश्नावर काम करून, शेतकऱ्यांची त्यातून सुटका करणे हे कोणाचं कर्तव्य आहे? आता साधं उदाहरण घ्या, गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढले आहे.वरवर दिसायला चांगली गोष्ट आहे,…
स्वामिनाथन आयोगाच्या लागू करण्यात आलेल्या २०१ शिफारशीपैकी १७५ शिफारशी युपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या होत्या तर केवळ २५ शिफारशी भाजपा सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते आणि कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली. त्याच बरोबर भाजपा सरकारने स्वामिनाथन आयोग लागू केला असल्याचा भाजपचा दावा पूर्णतः खोटा आहे अशी टीका केली . हमीभावा संदर्भात A2+FL आणि C2 हे दोन फॉर्म्युले नेहमीच चर्चेत येतात. A2+FL मध्ये बी-बियाणे, खते, कीटकनाशके अशा सर्वच निविष्ठांवरील खर्च तसेच शेतकरी कुटुंबाची मजूरी समाविष्ट असते. तर C2 मध्ये बी-बियाणे, खते, कीटकनाशके अशा सर्वच निविष्ठांवरील खर्च, शेतकरी कुटुंबाची मजूरी तर…
लोह अनेक एन्झाईम्स आणि काही रंगद्रव्यांचा घटक आहे आणि नायट्रेट आणि सल्फेट कमी करण्यास आणि वनस्पतीमध्ये ऊर्जा उत्पादनास मदत करते. लोहा चा वापर क्लोरोफिल (पानांमधील हिरवा रंगद्रव्य) च्या संश्लेषणात होत नसला तरी ते त्याच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. लोह (फेरस)कार्य : 1) पानांचा हिरवा रंग हा हरितद्रव्यामुळे (क्लोरोफील) येत असतो आणि म्हणून हरितद्रव्यांच्या निर्मितीसाठी लोहाची गरज असते. 2) प्रथिने (फेरॉडॉक्झिन) व विकर यांच्या निर्मितीत लोहाचा महत्त्वाचा सहभाग असतो. 3) प्रकाशसंश्लेषण व श्वसनक्रियेत लोहाचा सहभाग असतो. 4) नत्र, स्फुरद व पालाश यांच्या शोषणात लोहाचा अप्रत्यक्ष सहभाग असतो. कमतरतेची लक्षणे 1) हरितद्रव्यांच्या अभावामुळे पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो व शिरा फक्त हिरव्या दिसतात.…
युक्रेन जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदारांपैकी एक आहे आणि रशियन हल्ल्यापासून, पुरवठा लाइनवर गंभीर परिणाम झाला आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती जवळजवळ 40% वाढल्या आहेत. तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी, देशांनी इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या देशांमधून आयात करण्यास सुरुवात केली, परंतु अलीकडे इंडोनेशियाने देशांतर्गत टंचाईमुळे तेल बाजार तात्पुरते बंद केले आहेत. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या तुलनेत पाम तेल हे सर्वात स्वस्त खाद्यतेल आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे ६०% खाद्यतेलाच्या आयातीद्वारे आयात करतो, त्यापैकी एकूण आयातीपैकी ५०% पेक्षा जास्त पामतेल आहे. खाद्यतेल हे स्वयंपाकघरातील मुख्य उत्पादन आहे आणि प्रत्येकजण वापरतो. एका लिटर खाद्यतेलाची किंमत पूर्वी 125 रुपये होती, जी मार्चमध्ये 160-170…
दिवसातला १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश योग्य वेळी पाणी पुरवठा, किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव इ. मुळे खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे दीडदुपटीने जास्त उत्पादन मिळते. शिवाय ऐन उन्हाळ्याट जनावरांना पौष्टिक चार मिळतो आणि बेवड तसेच फेरपालट या दोन गोष्टी साध्य होतात. सर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी भुईमुगाचे जातीनिहाय उपट्या जातीचे वाळलेल्या शेंगाचे एकरी १० ते १२ क्विंटल आणि पसऱ्या जातीचे एकरी १२ ते १६ क्विंटल उत्पादन मिळते. शिवाय ढाळ्यांचा हिरवा अगर वाळवून पौष्टिक चारा २ ते ३ टन मिळतो. त्यामुळे ज्यांच्याकडे हमखास पाणीपुरवठा उपलब्ध आहे अश बांधवांनी नक्कीच उन्हाळी भुईमुग पेरावा. भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले…
भारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. लक्षणीय वाढत्या लोकसंख्येमुळे खाद्यतेलाची गरज खूपच वाढली आहे. भारतात सुमारे २५.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड होत असून सुमारे १२.५ दशलक्ष टन उत्पादन होत असले तरी दरवर्षी तूट येऊन जवळ जवळ एक हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले जाते. त्यासाठी तेलबियाखालील क्षेत्र वाढविणे, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आणि नवीन तेलबिया पिकांकडे विशेष लक्ष पुरविणे इत्यादी बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात लागवडीखालील असलेल्या तेलबिया पिकांमध्ये भुईमूग आणि मोहरी या पिकांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. जवळजवळ ९० टक्के खाद्यतेलाचे उत्पादन या दोन पिकांपासून मिळते. कोकण…
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या व्याज सवलत योजनेमध्ये विहित मुदतीत अल्प मुदत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून कर्जावर व्याज सवलत देण्यात येते. या योजनेमध्ये जे शेतकऱ्यांनी विहित मुदतीत कर्जाची परतफेड करतील त्यांना व्याज सवलत देण्यात येते. फायदे – व्याजात सवलत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची मुदतीत परतफेड करतील, त्यामुळे बँकांची वसुली वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता तीन लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध होईल. त्यातून वेळेवर कृषी निविष्ठांची खरेदी शक्य होईल. शेतकऱ्यांना उत्पादन वाढ मिळण्यास मदत होईल. काय आहे योजना -या योजनेत विहित…
