Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » मोहरी लागवड तंत्रज्ञान
ताज्या बातम्या

मोहरी लागवड तंत्रज्ञान

Neha SharmaBy Neha SharmaApril 26, 2022Updated:April 26, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारतीय दैनंदिन आहारातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाद्यतेल होय. याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. लक्षणीय वाढत्या लोकसंख्येमुळे खाद्यतेलाची गरज खूपच वाढली आहे. भारतात सुमारे २५.७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तेलबियांची लागवड होत असून सुमारे १२.५ दशलक्ष टन उत्पादन होत असले तरी दरवर्षी तूट येऊन जवळ जवळ एक हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आयात केले जाते. त्यासाठी तेलबियाखालील क्षेत्र वाढविणे, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे आणि नवीन तेलबिया पिकांकडे विशेष लक्ष पुरविणे इत्यादी बाबी विचारात घेणे आवश्यक आहे. भारतात लागवडीखालील असलेल्या तेलबिया पिकांमध्ये भुईमूग आणि मोहरी या पिकांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक लागतो. जवळजवळ ९० टक्के खाद्यतेलाचे उत्पादन या दोन पिकांपासून मिळते.

कोकण विभाग अतिपर्जन्याचा असल्यामुळे भाताशिवाय नागली आणि कारळा ही पिके डोंगर उतारावरील जमिनीत घेतली जातात. परंतु भात कापणीनंतर या भागातील जमिनी बहुतांशी पुढील पावसाळ्यापर्यंत पडीक राहतात. परंतु सध्या लघू व मध्यम पाटबंधान्यांमुळे सिंचनाची सोय वाढत आलेल्या प्रयोगावरून असे आढळून आले आहे की, मोहरीच्या ‘वरुणा’ या जातीपासून कोकणामध्ये जांभ्या दगडाच्या जमिनीमध्ये ओलिताखाली प्रती हेक्टरी १२ ते १५ किंवटल उत्पादन म्हणजेच खरीप हंगामात घेतल्या जाणा-या कारळा आणि तीळ या पिकांपेक्षा सुमारे ४ ते ५ पटीने जास्त मिळते. तसेच ‘पुसाबोल्ड’ या जातीचीही लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण ४० ते ४२ टक्के असून या पिकाच्या वाढीसाठी पाणी फारच कमी लागत असल्याने कोकणच्या जांभ्या जमिनीत हे महत्वाचे तेलबियाचे पीक म्हणून घेण्यास खूपच वाव आहे.

लागवड पद्धती

हवामान

मोहरी पिकाच्या वाढीसाठी थंड आणि कोरडे हवामान चांगले मानवते. म्हणून पेरणीच्या वेळी तापमान १६ ते २२ अंश सें.ग्रे.पेक्षा जास्त नसावे. उत्तम वाढीसाठी तापमान १८ ते २५ अंश सें.ग्रे. दरम्यान असल्यास पीक चांगले येते.

जमीन

या पिकासाठी मध्यम आणि उत्तम निच-याची जमीन असावी. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक घेता येते. भात पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना जमिनीची ताबडतोब उभी-आडवी नांगरट करून एक कुळवाची पाळी घालावी. हेक्टरी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत टाकून जमिनीत मिसळावे. या पिकाची पेरणी १० नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान करावी. सारायंत्राने सारे पाडून ७ ते ८ मीटर अंतरावर पाण्याचे पाट जमिनीच्या उतारास आडवे पाडावेत. पेरणीपूर्वी शेताला पाणी द्यावे. म्हणजे पेरणी करणे व खते घालणे सुलभ होऊन उगवण चांगली होते. जमिनीमध्ये वापसा आल्यावर या पिकाची पेरणी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवून, २.५ ते ३ सें.मी. खोलीवर करावी. रोपांची संख्या योग्य ठेवण्यासाठी हेक्टरी ५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणे थायरम हे बुरशीनाशक लावावे. पेरणीनंतर २0 ते २५ दिवसांनी विरळणी करून दोन रोपांतील अंतर १0 से.मी. ठेवावे.

खते व पाणी व्यवस्थापन

मोहरीच्या पिकाला पेरणीपूर्वी हेक्टरी २५ किलो नत्र आणि ४५ किलो स्फुरद, बियाण्यापासून ४ ते ५ सें.मी. बाजूला लहानलहान सन्या काढून द्यावे. तर राहिलेल्या नत्राचा दुसरा हाता म्हणजेच हेक्टरी २५ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. या पिकास एकूण ६ ते ७ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. तथापि पेरणीपूर्वी तसेच पीक फुलो-यात येताना आणि शेंगा भरण्याच्या वेळी पाणी देणे अतिशय महत्वाचे आहे. तरी साधारणपणे १0 ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी देऊन पीक तयार होण्यापूर्वी १० ते १५ दिवस अगोदर पाणी बंद करावे. शेतात ओलावा टिकून राहण्यासाठी दोन ओळीतील भागात कोळप्याने कोळपणी करावी. मोहरीचे पीक हरळी, लव्हाळा या तणांचा नाश करते. ज्या शेतात हरळी, लव्हाळा या तणांचा उपद्रव होतो, त्या शेतात आलटून पालटून मोहरीचे पीक आवर्जून घेतले पाहिजे. याशिवाय तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर २ ते ३ दिवसांनी तणाच्या उगवणपूर्व अवस्थेत ऑक्झीडायझॉन ०.४ किलो प्रती हेक्टरी फवारावे किंवा फ्लुक्लोरॅलिन १ किलो प्रती हेक्टरी पेरणीपूर्वी मातीत मिसळावे आणि ३० दिवसांनी एक खुरपणी करावी.

रोग आणि किडींचे नियंत्रण

पूर्वीच्या काळी मिश्रपीक म्हणून मोहरीची लागवड केली जात होती. तरी आज ते सलग पीक म्हणून आपल्याकडे भुईमुगानंतर स्थिर होत असल्याने या पिकावर मावा व पाने पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो.

 

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

फोटो क्रेडिट : विकिपीडिया

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.