Author: Neha Sharma

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 04/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 2708 400 1200 800 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 1370 300 750 600 पंढरपूर लाल क्विंटल 1938 150 1050 650 नागपूर लाल क्विंटल 1360 700 1100 1000 भुसावळ लाल क्विंटल 142 600 600 600 पुणे लोकल क्विंटल 11541 400 1200 800 पुणे- खडकी लोकल क्विंटल 7 800 1200 1000 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 13 800 1000 900 पुणे-मोशी लोकल क्विंटल 346 300 1000 650 नागपूर पांढरा क्विंटल 1000 900 1200 1125 लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 3500…

Read More

राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी दरवाढ जाहीर केली असून लघुदाब आणि उच्चदाब कृषिपंपांसाठी ४ रुपये १७ पैसे ते ८ रुपये ५९ पैसे प्रतियुनिट वाढ करण्यात आली आहे. २०२३-२४ मध्ये ९.३० तर २०२४-२५ या वर्षात २०.९३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महावितरणसह अन्य खासगी कंपन्यांनीही वाढ केली आहे. मात्र, महावितरणने केलेली दरवाढ अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा बोजा होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने महावितरण, बेस्ट, टाटा आणि अदानी वीज कंपनीचे २०२३-२४ आणि २०२४-२५ चे घरगुती, कृषी, औद्योगिक आणि वाणिज्यिक दर जाहीर केले आहेत. महसुली तूट भरून काढण्यासाठी कंपन्यांनी दरवाढीची मागणी केली होती. महावितरणची महसुली तूट ६७ हजार ६४३ कोटी…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 03/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 2101 300 1000 600 औरंगाबाद — क्विंटल 1950 200 900 550 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12648 700 1200 950 श्रीरामपूर — क्विंटल 1333 200 900 700 मंगळवेढा — क्विंटल 234 100 900 650 कराड हालवा क्विंटल 174 500 1400 1400 सोलापूर लाल क्विंटल 21483 100 1400 500 येवला लाल क्विंटल 1500 181 525 450 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 1200 200 547 521 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 905 350 801 600 नागपूर लाल क्विंटल…

Read More

जैविक कीड नियंत्रणासाठी जगभरात उपयोगात येणारा प्रमुख मित्र कीटक म्हणजे अंडीचे परजीविकरण करणारा ट्रायकोग्रामा मित्र कीटक. ट्रायकोग्रामा कीटक हा हायमेनोप्टेरा गण व ट्रायकोग्रामा टीडी कुटुंबात मोडणारा परोपजीवी मित्रकीटक असून ट्रायकोग्रामाच्या ८0 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. ट्रायकोग्रामा मित्रकीटक निसर्गतःच सर्वच प्रकारच्या वातावरणात तसेच संपूर्ण जगभरात आढळत असून पतंगवर्गीय, भुंगेरावर्गीय, माशीवर्गीय, ढेकूणवर्गीय कीटकांच्या अंडीवर परजीविकरण करणारा परोपजीवी कीटक असून ट्रायकोग्रामाचे जैविक कीड व्यवस्थापनात प्रभावी मित्रकीटक आहे. ट्रायकोग्रामा कीटक आकाराने अतिशय लहान (०.२ ते १.५ मि.मी.) असून प्रौढ ट्रायकोग्रामा मित्रकीटक अंडी अवस्थेतच किडीचे नियंत्रण करतात. पतंगवर्गीय कीटकांच्या अंडी शोधून त्यात अंडनिक्षेपक अंड्यांमध्ये घुसवून आपले अंडे टाकते. त्यानंतर अंडेनिक्षेपक घातलेल्या छिद्रातून आंतरिक दाबामुळे एक…

Read More

कांद्याला दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीचे लिलाव बंद पाडले होते. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना विरोधकांनी कांद्याला अनुदान देण्याची जोरदार मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य केली होती. यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळाला होता. मात्र हे अनुदान मिळण्यासाठी सरकारने काही अटी घातल्या आहेत. असे असताना त्यात एक अशी अट आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावं लागू शकतं. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. ती अट आहे ई पीक पेऱ्याची. अनेक शेतकरी अजूनही साध्याच म्हणजे फीचर फोनचा वापर करतात. त्यामुळे त्यांना ई पीकपेरा लावताना अडचणी निर्माण होत आहेत. लाल कांद्याच्या अनुदानासाठी सोमवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे…

Read More

क्षयरोगावर रामबाण इलाज असलेले जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे बेडाक्वीलीन औषधासाठीचे सेकंडरी पेटंट भारतीय पेटंट ऑफिसने नाकारले आहे. भारत, आशिया आणि आफ्रिकेतील काही गरीब देश यातील क्षयरोग रुग्णांसाठी ही आशादायक बातमी म्हणावी लागेल कारण हे सेकंडरी पेटंट नाकारल्यामुळे आता भारतीय जेनेरीक कंपन्या फक्त भारतासाठीच नाही तर इतर गरीब देशांसाठी स्वस्तात बेडाक्वीलीन औषध बनवू शकतील. बेडाक्वीलीनचे प्रायमरी पेटंट जुलै 2023 रोजी संपुष्टात येणार आहे. अशा वेळेस प्रायमरी पेटंट जेव्हा संपायला येते त्यावेळेस बऱ्याच बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्या ॲक्टिव इंग्रेडीयन्ट मध्ये बदल न करता औषधाच्या फॉर्म्युलेशन मध्ये किरकोळ बदल करून किंवा ॲक्टिव इंग्रेडीयन्टचा दुसरा सॉल्ट बनवून सेकंडरी पेटंट साठी दावा ठोकतात. आपल्या कंपनीची…

Read More

मागील काही दिवसांपासून बाजारात कापूस दरवाढीची चर्चा आहे. पण अनेक बाजारांमद्ये दर नरमलेल्या पातळीवरच दिसले. त्यामुळं शेतकरीही संभ्रमात होते. तुम्ही सांगता त्याप्रमाणं दरवाढ झाली नाही, असं अनेक शेतकरी सांगत होते. पण शेवटी काल सर्वच बाजारांमध्ये कापूस दर १०० रुपयाने वाढले. ही वाढ तुटपुंजी असली तरी तब्बल दोन महिने आवकेच्या (Cotton Arrival) दबावामुळं घसरलेल्या दरात ही वाढही आशादायक आहे. पुढील काळात दरात आणखी वाढ होऊ शकते, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस मागं ठेवल्यामुळं चित्र काहीसं बदललं. एरवी डिसेंबर आणि जानेवारीत कापसाची आवक जास्त असते. त्यामुळं दरही (Cotton Market) हंगामातील निचांकी पातळीवर असतात. तर फेब्रुवारीपासून आवक कमी…

Read More

सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा नाहीच. आता दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असून पहाटेच अमूलने गुजरातच्या जनतेला मोठा धक्का दिला आहे. अमूल दुधाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमूल ताझा, शक्ती, टी स्पेशल, गायीचे दूध, स्लिम अँड स्ट्रीम, गायीचे दूध, म्हशीचे दूध या ब्रँडच्या किंमतीत आता 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या खिशावर होणार आहे. अमूलने सहा महिन्यांत दुसऱ्यांदा दुधाच्या दरात वाढ केली आहे. वृत्तानुसार, नवीन किंमती आजपासून लागू होणार आहेत. आता नवीन किंमतींनुसार, अमूल गोल्ड 64 रुपये, अमूल शक्ती 58 रुपये आणि अमूल फ्रेश 52 रुपये प्रति लिटर दराने…

Read More

भारतात पपईची लागवड महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार व पश्चिम बंगाल इ. राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा या जिल्ह्यात पपई पिकाची लागवड केली जाते. कमी कालावधीत, कमी खर्चात चांगले उत्पन्न पपई या पिकातून मिळते. पपईचा उपयोग फळ म्हणून खाण्यासाठी वापरण्यात येणारी टुटी-फ्रुटी, जॅम, जेली इ. पदार्थ तयार करण्यासाठी, तर पपईच्या पेपेनपासून औषधे, च्युईंगम तयार करतात. पपई लागवड करण्यासाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रीत पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक असते. तसेच मुख्य खोडाभोवती कायमस्वरूपी पाणी साठले नाही पाहिजे जमीन…

Read More

मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम विदर्भातील दूध उत्पादक, व्यापारी दादर कडब्यासाठी खानदेशात येत आहेत. रोज २० ते २२ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) कडब्याची खरेदी केली जात आहे. दर्जेदार कडबा असल्याने दर चांगले आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा भागांतून दादर ज्वारीचा कडबा खरेदी सुरू आहे. खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची (Dadar Jowar Fodder) आवक बऱ्यापैकी आहे. पण उठाव असल्याने दरही पाच हजार (Fodder Rate) ते साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे स्थिर आहेत. मका, बाजरी, संकरित ज्वारी आदींचा कडबा अद्याप तयार झाला नसल्याची स्थिती आहे. सध्या दुधाला चांगले दर असल्याने शेतकरी खरेदी करत आहेत. दरम्यान, याठिकाणी मका, बाजरी, संकरित ज्वारीची कापणी पुढील १५…

Read More