Author: Neha Sharma

फळबागेत आच्छादनाचा वापर केल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी करता येतो त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकवून राहण्यास मदत होते. खोडांना बोडोंपेस्ट लावावी. फळझाडांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे, वाढते तापमान, गरम वारे, कोरडी हवा याचा विपरीत परिणाम नवीन लावलेल्या फळझाडांवर तसेच फळे देणाऱ्या झाडांवर होत असतो. यामुळे मुख्यत्वे कोवळी फूट करपणे, खोड तडकणे, फळगळ होणे, फळांचा आकार लहान होणे, सर्व पाने, फळे गळून झाडे वाळून जाणे, झाडांची वाढ थांबणे, शेवटी झाड मरणे असे प्रकार होतात याकरिता पाणी आणि उपलब्ध साधनांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर : ठिबक सिंचन, भूमिगत सिंचन पद्धतीने थेट फळझाडांच्या मुळापाशी गरजेनुसार पाणी द्यावे. प्रचलित पद्धतीपेक्षा ५० ते…

Read More

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी  संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी गांधीगिरी केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत कांदा विकावा लागत आहे. उद्विग्न शेतकऱ्याकडून कांद्याची होळी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मातुलठाण गावातील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे…

Read More

गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिक  शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा जोरदार बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार दोन दिवसांच्या अवकाळीने तब्बल 2600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर (Farmer) दुहेरी संकट ओढवले आहे. राज्यभरात अवकाळी पावसाने  शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले असून राज्यातील विभागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे आहे. आजही अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या दोन दिवसांपासून नाशिक (Nashik  District) जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. तर आणखी दोन दिवस या अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मात्र मागील दोन ते…

Read More

पाकिस्तानमधील कापड उद्योग सध्या गहन संकटात आहे. आधी पाकिस्तानधील कापूस उत्पादन ३० टक्क्याने घटले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती बिघडल्याने आयातीसाठी विदेशी चलनाचा तुटवडा आहे. आता सरकारने वीजदर आणि व्याजदर वाढवल्याने येथील कापड उद्योग  अडचणीत आला. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कापूस दरात अपेक्षेप्रमाणे वाढ झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत कापसाला महत्वाचे स्थान आहे. कापसाला चालणाऱ्या उद्योगांमध्ये रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होते. तर निर्यातीतून पाकिस्तानला विदेशी चलन मिळते. पण यंदा पाकिस्तानमधील कापूस आणि कापड उद्योग सहन संकटात आला. ऑल पाकिस्तान टेक्सटाइल मिल्स एसोसिएशनने सरकारकडे वीज दरात सवलत देण्याची मागणी केली. कारण सरकारने वाढविलेल्या वीज दर आणि व्याजदरामुळे कापड उद्योग अडचणीत आला आहे. पाकिस्तानने…

Read More

मागील काही तासांत राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस अद्यापही राज्यातील काही भागात अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता असून आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात ढगाळ हवामानासह (Weather) अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या कडकताटासह ढगांच्या गडगडाटाट अवकाळी पाऊस बरसला. जिल्ह्यातील बागलाण, सटाणा, येवला, लासलगाव, मनमाड, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी पिकांना अवकाळीचा जोरदार फटका बसला असून आहे. दुसरीकडे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज नाशिकसह जिल्ह्यात…

Read More

‘ब्लॅक थ्रीप्स’  या फूलकिडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे समोर आले असून मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कलर कॅप्सिकम आणि कॅप्सिकम उत्पादक अर्थात सिमला मिरची उत्पादक शेतकरी या किडीच्या प्रादुर्भावामुळे अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी केलेला खर्चही निघणार नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. ढोबळी मिरची उत्पादनात प्रचंड घट महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये तसंच राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फूलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’  असे आहे. फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे. ही प्रजाती भारतामध्ये 2015 मध्ये प्रथम पपई या पिकावर आणि त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 10516 400 1400 900 औरंगाबाद — क्विंटल 1641 200 900 550 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 14804 700 1300 1000 खेड-चाकण — क्विंटल 760 800 1400 1100 विटा — क्विंटल 50 500 1000 650 सातारा — क्विंटल 274 900 1300 1100 मंगळवेढा — क्विंटल 117 200 1200 900 कराड हालवा क्विंटल 99 700 1500 1500 सोलापूर लाल क्विंटल 68626 100 1550 600 लासलगाव लाल क्विंटल 8000 400 1052 750 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 3880…

Read More

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 06/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 150 3000 5200 5150 संगमनेर — क्विंटल 1 5000 5000 5000 सिल्लोड — क्विंटल 35 4900 5100 5000 तुळजापूर — क्विंटल 75 5000 5150 5100 मोर्शी — क्विंटल 320 5000 5050 5025 राहता — क्विंटल 6 4600 5084 4950 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 41 5087 5263 5225 गंगापूर हायब्रीड क्विंटल 3 4700 4850 4800 सोलापूर लोकल क्विंटल 42 4800 5160 5080 कोपरगाव लोकल क्विंटल…

Read More

देशातील बहुतांश भागांत मार्च ते मे या तीन महिन्यांत उष्णेत्या लाटांचा  सामना करावा लागण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने  म्हणजे ‘आयएमडी’ने  तसा अंदाज व्यक्त केला आहे. एरवी फेब्रुवारी महिना गुलाबी थंडीसाठी ओळखला जातो. परंतु यंदाचा फेब्रुवारी मात्र त्याला अपवाद ठरलाय. दिवसा कडाक्याचं ऊन आणि रात्री व पहाटे थंडी असा माहौल बहुतांश ठिकाणी राहिला. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात दिवसा कडक उन्हाळ्याचा अनुभव आला. यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सगळ्यात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. फेब्रुवारीमध्ये सरासरी कमाल तापमान २९.५४ अंश सेल्सिअस राहिलं. १९०१ नंतरचा हा उच्चांक आहे. गेल्या १२२ वर्षात यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७३ अंश जास्त राहिले, तर…

Read More

मागील आठवडाभरात तूर बाजारात समिश्र स्थिती राहिली. आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात  होणाऱ्या तुरीला उठाव कमी होता. तर देशातील तूर शेतकऱ्यांनी मागं ठेवल्याचं दिसतं. त्यामुळं तुरीच्या दरात  काहिसे चढ उतार होते. सरकारने तूर आयातीवरील १० टक्के शुल्कही काढले. पण भारतात प्रामुख्याने आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात होते. हे देश अविकसित असल्याने या देशांमधून आयात होणाऱ्या तुरीवर शुल्क लागू होत नाही. त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा तूर बाजारावर परिणाम होणार नाही. देशात यंदा उत्पादन घट जास्त असल्याने आयातीतूनही गरज पूर्ण होणार नाही. त्यामुळं तुरीचे दर तेजीत राहतील. मार्च महिन्यात सध्याच्या दरात १०० ते २०० रुपयांचे चढ उतार राहू शकतात. पण गुणवत्तेच्या तुरीचे भाव ८ हजार…

Read More