बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढतो.महाराष्ट्रात बांबूच्या 121 जाती असून त्यापैकी बोरबेट,सोनचिवा,मानवेल, कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत.

ठिंबक सिंचन ओलित वर बांबूची लागवड करून 70 मे टन उत्पादन मिळत.विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा बांबू ची लागवड आढळून येते.पूर्वीं बांबू वन वृक्ष कायद्यामध्ये अंतर्भूत होते परंतु अलीकडे बांबू चा समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्याने च बांबू लागवड आता शेतात किंवा बांधावर करता येईल व तोडनि ला सुद्धा टी. पी लागणार नाही, त्यासंबंधी सरकारी बंधने काढली आहेत या संबंधी रिझोल्युशन बी बी एस 2017/सी .न.501/एफ 9 दि.11.4.2017.हा आहे.


आधुनिक पद्धतीने ऊती संवर्धित तंत्र पासून तयार केलेली बांबूची रोपांची लागवड ठिंबक संचावर केल्यास ,वाढ फार झपाट्याने होत असते आणि 3 ते 4 वर्ष्यात कापणीला येतो.प्रति वर्षी 5500 ते 12000 बांबू प्रति वर्षी प्रति हे. क्षेत्रातून उत्पादन सलग 35 वर्ष पर्यंत मिळत राहते.


💐बांबू लागवड का?व फायदे:-
१)सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते.
2)आंतर पीक जसे की अद्रक,हळद,भाजीपाला यांची पिके लागवड करता येते.
३)जमिनीची धूप व पर्यावरण समतोल राखण्यास मदत होते.
४)बांबू पासून घर,छप्पर,चटई, टेबल,पंखा हातमाग वस्तू,प्लाई, दागिने ,टाईल्स,वाद्य यंत्र ,अगरबत्ती कपडे,एक्स्पोर्ट दर्जाचे कपडे , इ बनविण्यात उपयोग होतो.
५)बांबू पासून इथेनॉल बनविता येत .आता पेट्रोलियम मंत्रालय ,भारत सरकार यांनी 20% इथेनॉल पेट्रोल मध्ये मिश्रण करण्यास परवानगी दिलेली आहेत.
६) बांबु पासून आता इंधन गॅस तयार करता येतो.
७)पाणी शुद्ध करण्याच्या मोठ्या प्रकल्पामध्ये चारकोल म्हणून उपयोग होतो.
८)हॉटेल इंडस्ट्रीज मध्ये स्वयंपाक गृहात बांबू पासून बनविलेल्या ब्रिकेट,पॅलेट चा उपयोग होतो.
९)कृषी पर्यटन,पर्यटन मधील आखीव व रेखीव घर ,रूम बांधण्यासाठी बाबूचा उपयोग होत असतो.
१०)जैविक कुंपण म्हणून शेत बांधावर लागवड करतात.जनावराना कोवळा चार म्हणून उपयोग होतो.
११)स्टील ला पर्याय म्हणून घर बांधणीत बांबूचा वापर वाढत आहेत.
१२)एकदा बांबू लागवड केल्यानंतर सलग 25 ते 35 वर्ष उत्पादन देत राहत.
१३)शेती मध्ये बांबु चा प्रामुख्याने संत्रा फळ झाडाला,टोमॅटो,वेल वर्गीय भाजीपाला पिकाला आधार देण्यासाठीं सुद्धा उपयोग होतो.
१४)कागद करखान्या मध्ये बांबू ला फार मागणी असते.
१५)बांबूच्या कोवळ्या कोंब पासून उत्तम प्रकारची भाजी,लोणचं ,सूप बनविता येत तसेच फार्मा इंडस्ट्रीज मध्ये उपयोग होतो.
१६)बांबू हे गरिबांचे लाकूड आहे व त्याला हिरव्या सोन्याची उपमा दिली आहे जे मानवाच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत कधी पाळणा, कधी लाकडी खाट,कधी टेबल,कधी झोका तर कधी म्हातारं पणाची काठी आणि मृत्यू झाल्यावर शव ठेवण्यासाठी बांबू चा उपयोग होत असतो.


💐लागवड:-
बांबूचिं लागवड जून जुलै मध्ये करावी.कोकणात कंदमूळने लागवड होते. एप्रिल(उष्ण)या महिन्यात लागवड करू नये.
💐खड्डा आकार:-१)उथळ जमीन- 222 फूट. २)मध्यम जमीन-1.51.51.5 फूट.


💐अंतर:-
१)सलग लागवड:-4 मी2.5मी. २)कृषी आणि वन पद्धत लागवड:-6मी2मी.
३)बांधावर लागवड :-2मी*2मी.


लागवड करताना 2 घमेले शेणखत,100 ग्रॅम सि .सु .फॉ व बुरशी नाशक आणि फॉरेट खड्डे मध्ये टाकावे.
सिंचन:- भरपूर ,निरोगी व उत्तम व झपाट्याने वाढीसाठी बांबू पिकास ठिंबक संच बसविणे फार आवश्यक आहेत.पहिल्या 2 वर्ष पर्यंत 8 लिटर /झाड हिवाळ्यात महिन्यातून 2 वेळ आणि उन्हाळ्यात 3 वेळ ठिंबक संच ने पाणी द्यावे.
लागवड केल्यानंतर बांबू झाडाची विरळणी,कीड व रोग व्यवस्थापण,आंतर पीक लागवड,बांबू तोड पद्धती,ग्रेडिंग व बाजारपेठ इ. विषयी संपूर्ण मार्गदर्शन बळीराजा इरिगेशन व सर्विसेस आणि ऍग्रो सोल्युशन,काटोल मो न. 9975115254 कडून करण्यात येईल.
धन्यवाद.


श्री.गुणवन्त एस. डफरे(मुख्य कृषी तज्ञ). एम.एस्सी(कृषी),एमबीए,पुणे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शेती मधील ,उच्च कृषीतंत्राचा ,सुमारे 21 वर्षीचा प्रत्यक्ष अनुभव.
9765403911☘