महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून लवकरच अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.
Maharashtra HSC Result 2023 Date : गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या म्हणजेच, गुरूवारी 25 मे रोजी रोजी जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर, निकाल msbshse.co.in आणि hscresult.mkcl.org, या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.विज्ञान, वाणिज्य आणि कला या तिन्ही विभागांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचं अधिकृत संकेतस्थळ असलेल्या mahresult.nic.in वर पाहता येईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (mahresult.nic.in) जाऊन HSC result 2023 या लिंक वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर आणि जन्म तारीख टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या.