Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » शेतकऱ्‍यांनी विजाबाबत बचावासाठी घ्यावी काळजी
कृषी-चर्चा

शेतकऱ्‍यांनी विजाबाबत बचावासाठी घ्यावी काळजी

Neha SharmaBy Neha SharmaApril 17, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

विजा दहा ते पंधरा किलोमीटर दूर चमकत असल्या तरी क्षणात तेवढा प्रवास करून विजा आपल्यापर्यंत पोहचू शकतात, त्यामुळे काळे ढग दाटून आले, की विजांचा कडकडाट दिसण्याची किंवा गडगडाट ऐकू येण्याची वाट न पाहता ताबडतोब सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
– गारपीट, अवकाळी पावसात विजा चमकत असताना तातडीने सुरक्षित जागेत आसरा घेऊन प्रत्येक शेतकरी आपले प्राण वाचवू शकतो.
– झाडांना बांधून ठेवलेली किंवा उघड्यावर फिरत असलेली जनावरे, तसेच धातूच्या पत्र्यांचा गोठ्यासाठी वापर यामुळे मोठ्या संख्येने जनावरे दगावतात.
– वीज आपल्यावर कोसळूच नये यासाठी अधिक काळजी घेणे आवश्‍यक आहे.
१) विजा चमकत असताना, शेतातील कामे त्वरित थांबवावीत.
२) वाहत्या पाण्यात किंवा ओल्या भिंतीजवळ थांबू नये.
३) मोकळ्या मैदानावर अथवा उंच टेकडीवर फेरफटका मारण्याचा मोह टाळावा.
४) विजा चमकताना दिसू लागताच पक्क्या, कोरड्या, बंदिस्त अशा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
५) पाऊस नसला तरी विजांचा लखलखाट दिसला किंवा ढगांचा गडगडाट ऐकू आला तरी सर्व कामे थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
६) उंच किंवा बुटक्या अशा कुठल्याही झाडाखाली विजा चमकत असताना किंवा पावसात आसरा घेऊ नये.
७) झाडाला मोकळ्यावर जनावरे बांधून ठेवू नयेत किंवा जनावरांना भिजत उघड्यावर सोडू नये.
८) जनावरांचे गोठे, घरांचे छप्पर धातूच्या पत्र्याचे असल्यास तातडीने धातूचे पत्रे काढून त्याऐवजी एसबेस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्रे बसवावेत. स्वतःचे पशुधन व कुटुंब सुरक्षित करावे.
९) शक्य असल्यास द्राक्ष, फळबागांमध्ये वेली चढविण्यासाठीचे मंडप उभारण्यासाठी धातूच्या खांबांऐवजी बांबू किंवा प्लॅस्टिकच्या मजबूत पाइपचे खांब वापरावेत, तसेच मंडपात धातूच्या तारा, जाळ्या वापरण्याऐवजी नायलॉनच्या दोऱ्‍या व नायलॉनच्या जाळ्यांचा वापर करावा.
१०) शेतातील आसऱ्‍याच्या ठिकाणापासून धातूचे तुकडे, धातूचे पाइप, धातूच्या सळ्या, धातूची अवजारे दूर ठेवावीत. अनावश्‍यक धातूच्या वस्तूंचा साठा टाळावा.
११) ट्रॅक्टर, चारचाकी व दुचाकी वाहने यांचे वीज पडून होणारे नुकसान टाळण्यासाठी पार्किंगचे शेड एसबेसस्टोसचे किंवा प्लॅस्टिकचे पत्र्याचे असावे.
१२) विजेचे मीटर, पंप व तो चालू-बंद करण्याचे बटन आदी पावसाच्या पाण्याने भिजणार नाही याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने ते बंद किंवा सुरू करताना अनेक अपघात होतात यासाठी स्वयंचलित टायमर असलेले पंप किंवा रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्‍या बटनांचा उपयोग ते बंद-चालू करण्यासाठी करता येऊ शकतो.
१३) सुरक्षिततेसाठी लायटनिंग अरेस्टर अथवा कंडक्टर, योग्य उंच ठिकाणी बसवून वाड्या, पाड्या तसेच गावातल्या वस्तीच्या ठिकाणची हानी टाळता येईल. त्या बाबत आग्रहासाठीचा अर्ज जिल्हाधिकाऱ्‍यांकडे करता येऊ शकतो. गाव-वर्गणीतून देखील असे उपक्रम शेतकरी राबवू शकतात.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.