1997/98 गळीत हंगामात जागतिक पातळीवर साखरेचे दर 380 डॉलर पोहोचले होते आणि डॉलर ची रुपये मधील तुलना 34₹ ला एक डाॅलर होता, तेव्हा भारतीय साखरेचे दर 1100₹ च्या वर गेले आणि आमच्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाला भाव 1000₹ पेक्षा जास्त दिला होता. हा जागतिक साखरेच्या दराचा इतिहास आणि रुपया आणि डॉलरच्या चलनाची तुलना केली तर जो जागतिक पातळीवर साखरेचा भाव निर्माण झाला त्याचा परिणाम म्हणून आपणास ऊसाला जास्त भाव मिळू शकला,. तो इतिहास पाहता सन 2001/2च्या गाळप हंगामात जगातील साखरेचा भाव खाली येऊन तो 215 डाॅलर पर्यंत खाली आलेले होते. आणि डाॅलर भाव 45₹ गेला होता म्हणून आपणास ऊसाला 800/900₹घ्यावे लागले होते. तिच अवस्था 2005/6 मध्ये बदलून 470 डाॅलर ला साखरेचे भाव गेले होते तेव्हा आपणास 1500₹दरम्यान वेगवेगळ्या साखर कारखान्यांकडून ऊसाला भाव मिळाला होता. 2009/10 गाळप हंगामात जगातील साखरेचा भाव 700डाॅलरच्या वर गेले आणि डाॅलर 45 रु दरम्यान होता म्हणून आपणास ऊसाला भाव 2500₹ च्या वर मिळाला. 2016/17 गाळप हंगामात जगातील साखरेचा भाव 325 डाॅलर होता पण डाॅलरची किंमत वाढली आणि 64 रुपये होती तेव्हा आमच्या हुतात्मा कारखान्याने 3325₹ भाव दिला होता. पुढे साखरेचे भाव जागतिक पातळीवर पडले आणि 2019/20मध्ये ते 305 डाॅलर पर्यंत खाली आले परंतु डाॅलर 71₹ असल्याने आपणास ऊसाला भाव 2800/2900₹ पर्यंत मिळाले.
शेतकरी बंधूंनो सध्या जागतिक पातळीवर साखरेचे भाव गगनाला भिडले आहेत तो भाव 12 वर्षा पूर्वीच्या किमतीच्या 700 डाॅलर पर्यंत गेले आहेत, आणि दुसरीकडे रुपयांची किंमत डाॅलरच्या तुलनेत फार कमी झाली आहे म्हणजे 82₹ला एक डाॅलर झाली आहे अशा वेळी आपल्या देशातील साखरेच्या किंमती 5800₹ क्विंटल होऊन आपणास ऊसाला भाव 5000₹ पेक्षा जास्त मिळायला पाहिजे होते. पण आपल्या देशातील साखरेच्या किंमती वेगवेगळ्या मार्गांनी निर्बंध घालून महागाई च्या नावाने कमी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे आज पर्यंत ज्या पद्धतीने जगातील साखरेचा भाव वाढले मुळे आपणास ऊसाला उच्चांकी भाव मिळवण्यासाठी संधी मिळाली होती ती या वेळी मिळताना दिसत नाही, कारण आपल्या देशातील साखरेच्या किंमती कमी ठेवण्याचा होणारा प्रयत्न केला गेल्या मुळे. त्याचाच भाग म्हणून एफ् आर पी भोवती भाव मागणी करुन ऊसाची किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न करुन साखरेचे दर कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यातच साखरेची विक्री किंमत म्हणजे साखरेचा एम एस पी कमी म्हणजे 31रुपये ठेवून बाजारातील साखरेचा भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केला आहे. निर्यात बंदी, वायदा व्यापार बंदी, साठवण बंदी, साठवण मर्यादा, अशा अनेक मार्गांनी साखरेचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. सध्या जागतिक साखरेचे दर पाहता आपल्या देशातील ऊसाला निवीन विक्रमी भाव मिळवण्यासाठी संधी असताना तशी संधी सरकारच्या धोरणामुळे घेता येत नाही आहे. उलट एफ् आर पी/ आर एस एफ्/ एम एस पी सारख्या कायदेशीर जोखडात ऊस दराचा मुद्दा अडकवला जाऊन जी अवस्था दुधाची झाली आहे. सरकारने भाव वाढवल्या शिवाय वाढत नाहीत तिच अवस्था ऊसाची ही करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि दुर्दैवाने अनेक शेतकरी संघटना एफ् आर पी भोवती भाव मागणी करुन तशा षड्यंत्राचे बळी पडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला जास्त भाव मिळण्यासाठी आलेल्या संधीपासून रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे वाईट.
रावसाहेब ऐतवडे नांद्रे ता मिरज जिल्हा सांगली.