सध्या राज्यात उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे.

कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही.

असे असताना अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब शेतकऱ्यांसाठी आहे.