Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन सापळ्यांचे महत्त्व !
ताज्या बातम्या

एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन सापळ्यांचे महत्त्व !

Neha SharmaBy Neha SharmaMay 20, 2022No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नमस्कार शेतकरी बंधूनो, कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड नियंत्रण होण्यास मदत होते. किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी फेरोमोन सापळ्यांचा वापर फायदेशीर ठरतो.
प्राणी वर्गातील कीटक हा सर्वात मोठा वर्ग आहे. कीटक स्वकीयांशी सुसंवाद किंवा संबंध साधण्यासाठी शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडतात. तो गंध स्वकीयांमध्ये विशिष्ट प्रकारच्या संदेशवहनाचे कार्य करतो. या वासामुळे नर/मादीमध्ये चेतना निर्माण होऊन नर-मादी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि समागमासाठी योग्य जोडीदार मिळवू शकतात, त्यामुळे या गंधाला कामगंध (फेरोमोन) असे म्हटले जाते.

अ) लिंग प्रलोभन रसायन (ल्यूर):-
वेगवेगळ्या किडींचा फेरोमोन वेगवेगळा असतो. काही कीटकांमध्ये नर कीटक मादीला, तर काहींमध्ये मादी कीटक नराला आकर्षित करतात. कीटकांच्या या सवयी लक्षात घेऊन कृत्रिम कामगंध (फेरोमोन) तयार केले जातात. फेरोमोन सापळे मोठ्या प्रमाणात लावल्याने लिंग प्रलोभन रसायनांचे (ल्यूर) सूक्ष्म कण वातावरणात पसरतात. कीटकांच्या शरीरातून सोडला जाणारा गंध आणि वातावरणातील कृत्रिम रसायनांचा संदेश यातील फरक त्यांना कळेनासा होऊन त्यांचा गोंधळ उडतो आणि मीलन होऊ शकत नाही.

आ) फेरोमोन सापळा :-
कामगंध सापळ्यास इंग्रजीत ‘फेरोमोन सापळा` किंवा ‘फनेल ट्रॅप’ असेही म्हणतात. हा कमी खर्चाचा व रासायनिक प्रदूषणविरहित उपाय आहे. हा नरसाळ्याच्या आकाराचा असून प्लॅस्टिकचा बनविलेला असतो. त्याची खालची बाजू मोकळी असून त्यास एक प्लॅस्टिकची पिशवी लावण्यात येते. वरची बाजू एका झाकणाने झाकलेली असते. त्यास आतील बाजूस ‘आमिष’ लावण्याची सोय असते. त्यास मादीचा वास असणारे एक रसायन लावण्यात येते. त्यामुळे नर हा मिलनाकरिता मादीच्या शोधात कामगंध सापळ्याकडे आकर्षित होतो. यामध्ये प्रौढ पतंग आल्यास तो अडकून पडतो. त्यास बाहेर निघणे शक्‍य होत नाही. असे जमा झालेले नर पतंग पाच ते सात दिवसांत मरतात. अशा प्रकारे किडीची पुढील पिढी तयार होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येते. त्यामुळे कीडनियंत्रण चांगल्या प्रकारे होते. अशा पद्धतीने प्रत्येक किडीसाठी वेगळा ल्यूर वापरून त्या त्या किडीचे व्यवस्थापन करता येते.

इ) पिकांमध्ये सापळे लावण्याची पद्धत :-
१) सर्वेक्षणासाठी प्रत्येक जातीच्या कीटकांसाठी हेक्‍टरी पाच सापळे आवश्‍यक. किडीचे पतंग मोठ्या प्रमाणावर पकडण्यासाठी हेक्‍टरी १५ ते २० सापळे गरजेचे. लहान क्षेत्र असल्यास सापळे शेताच्या आकारानुसार लावावेत.
२) सापळे लावताना पिकाच्या उंचीवर साधारणपणे एक ते दीड फूट उंचीवर लावावेत. दोन सापळ्यांमध्ये १५ ते २० मीटर अंतर ठेवावे. शेताच्या आकारमानानुसार हे अंतर कमी – जास्त करता येईल.
३) सापळ्यामधील ल्यूर लावताना पॅकिंग वर दिलेल्या सूचनांचे पालन करून १५-२१ दिवसांनंतर ल्यूर बदलावेत.
४) प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे सापळे वापरावेत. सापळ्यात अडकलेले पतंग दर आठवड्याला काढून नष्ट करावे.
५) सापळा साधारणतः पिकाच्या उंचीनुसार जमिनीपासून दोन ते तीन फुटांवर राहणे आवश्‍यक.

ई) फ्लाय ट्री ट्रॅप सापळे वापरताना घ्यावयाची काळजी
१) सापळा बांबूला बांधताना घट्ट बांधावा, त्यामुळे वाऱ्याने पडणार नाही.
२) ल्यूर लावताना हाताला उग्र वास उदा. कांदा, लसूण नसावा.
३) ल्यूरचे पॅकिंग फोडण्यापूर्वी ते फाटलेले नसल्याची खात्री करून घ्यावी. पॅकिंग फाटलेले असले तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
४) जोराची हवा व पाऊस असल्यास सापळ्यांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. सापळ्यात येणारे पावसाचे पाणी काढण्याची व्यवस्था ठेवावी.
५) सापळ्याची पिशवी बांबूस घट्ट बांधावी. त्यामुळे वाऱ्याने न फडफडता नुकसान होणार नाही.
६) ल्यूर वेळेवर बदलावेत. त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळतात.
७) सापळ्यात अडकलेले पतंग मेल्यानंतर वेळच्या वेळी ते काढून टाकावेत. अन्यथा, कुत्रे, मांजर, पक्षी हे सापळ्यातील मेलेल्या पतंगाकडे आकर्षित होऊन सापळ्यास नुकसान होण्याची शक्‍यता असते. सापळ्यात पावसाचे पाणी साचले व त्यात मेलेले पतंग असतील तर त्याचा दुर्गंध पाळीव कुत्र्यांस आकर्षित करतो. त्यामुळे कुत्रे अशा सापळ्यांचे नुकसान करतात. यासाठी सापळ्याच्या खालच्या बाजूस काटेरी फांदी लावल्यास फायदा मिळेल.

उ) वेगवेगळ्या पिकासाठी लागणारे फेरोमोन ल्यूर :-
अ.क्र. = ल्यूर चे नाव = किडीचे नाव = सापळा = पीक
१. हेली ल्यूर = हिरवी बोंड अळी = फनेल सापळा = कापूस ,तूर , हरभरा, टोमॅटो, मिरची, मका.

२. पेक्टीनो ल्यूर = गुलाबी बोंड अळी = डेल्टा स्टिकी सापळा = कापूस

३. गॉस्सी ल्यूर = गुलाबी बोंड अळी = फनेल सापळा = कापूस

४. स्पोडो ल्यूर = तंबाखू वरील पाने खाणारी अळी = फनेल सापळा = सोयाबीन कापूस ,भुईमूग, सूर्यफूल, मिरची

५. एअर वीट ल्यूर = ठीपक्याची बोंड अळी = फनेल सापळा = भेंडी, कापूस

६. ल्यूसी ल्यूर = शेंडा आणि फळ पोखरणारी अळी = वाॅटर सापळा = वांगी

७. बोम्बिकोल ल्यूर = रेशीम पतंग = फनेल सापळा = तुती

८. व्हॅक्यू ल्यूर = वेलवर्गीय फळ माशी = फ्लाय ट्री ट्रॅप = काकडी, दोडका, दुधी भोपळा, कारली, ढेमसे, कलिंगड, खरबूज.

९. बॅडोर ल्यूर = फळ झाडावरील फळ माशी = फ्लाय ट्री ट्रॅप = संत्रा, आंबा, मोसंबी, पेरू, चिकू

सतिश भोसले ,09762064141.

फोटो क्रेडिट : shutterstock

Integrated Disease Control pheromone traps SATISH BHOSALE सतीश भोसले
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

ताज्या बातम्या August 14, 2026

1. Cosa Rende Tower Rush un’Esperienza Casinò a Colpo RapidoNel mondo del gioco d’azzardo online,…

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.